आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

प्रजापिता ब्रह्मकुमारी तळेगाव दाभाडे आयोजित ज्योतिर्लिंग दर्शन व आध्यात्मिक झाकी प्रदर्शन उद्घाटन समारंभ संपन्न!

"किण रावणरी बाहे काटु ? किण लंकामे आग लगाऊ ? घरघर रावण! घरघर लंका ! इतने राम कहासे लावू ?"

Spread the love

 अध्यात्मिक :  प्रजापिता ब्रह्मकुमारी तळेगाव दाभाडे आयोजित ज्योतिर्लिंग दर्शन व आध्यात्मिक झाकी प्रदर्शन उद्घाटन समारंभ संपन्न! 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ फेब्रुवारी.

भारतीय संस्काराने झालेल् सौंदर्य ही त्या व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती असते! या हेतूने -गेले महिनाभर तळेगाव स्टेशन आणि शहर विभागातील प्रत्येक घरापर्यंत हे उत्तम संस्कार प्रसाराचे  कार्य गेले महिनाभर या प्रजापिता बंधू भगिनींनी केलेलं आहे.

या उदात्त अभियानास नेतृत्व होते ते म्हणजे- ब्रह्माकुमारी प्रभादीदी आणि सर्वांर्थाने त्यांना साथ देणाऱ्या मीनादीदी यांचे, महाशिवरात्रीच्या निमित्ताने या अविरत चाललेल्या अभियानाची सांगता ज्योतिर्लिंग दर्शन आणि अध्यात्मिक झाकी प्रदर्शनाच्या उद्घघाटनाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.

 

साप्ताहिक अंबरचे संपादक.  सुरेश साखवळकर-  प्राध्यापक जयंत जोर्वेकर- ज्येष्ठ लेखक वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी- उद्योजक बिरजू किल्लावाला ज्येष्ठ पत्रकार मनोहर दाभाडे आणि माजी नगराध्यक्षा  मीराताई फल्ले यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाचा अत्यंत देखणा उद्घघाटन सोहळा पार पडला.

मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना ब्रम्हा कुमारी प्रभादीदी, यांनी या प्रदर्शना मागील आपली भूमिका अतिशय साध्या सरळ आणि मोजक्या शब्दात व्यक्त केली. हे प्रदर्शन दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी पर्यंत सकाळी नऊ ते बारा व संध्याकाळी पाच ते नऊ या वेळात नाना नानी पार्क समोर असलेल्या अवधूत बंगल्यात, साधकां साठी उपलब्ध राहील.

“किण रावणरी बाहे काटु ? किण लंकामे आग लगाऊ ? घरघर रावण! घरघर लंका ! इतने राम कहासे लावू ?” अशी आजची समाजाची सद्यस्थिती आहे . अशावेळी आहारात सत्व; वागण्यात तत्व; आणि बोलण्यात ममत्व, असेल तर निश्चितच जीवनाला महत्त्व प्राप्त होतं!!आणि त्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी सारख्या अशाच अध्यात्मिक संस्कारातून समाजाला दिशा देणाऱ्या संस्थांची गरज असते, ती गरज खऱ्याअर्थाने या संस्थेने निश्चितच पूर्ण केली आहे. असे उद्गगार ज्येष्ठ लेखक- वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी, यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. परंपरागत चालत आलेल्या भारतीय संस्कृतीला विसरत चाललेल्या नव्या पिढीला अशा अध्यात्मिक संस्काराची खरोखरच आवश्यकता आहे, आणि हे महान कार्य आपण या संस्थेच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे करीत आहात त्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन- आपल्या मनोगतात सुरेश साखवळकरसरांनी व्यक्त केले.

माजी नगराध्यक्षा मीराताई फल्ले,यांनीही या अभियानाला शुभेच्छा दिल्या,हा संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात- ब्रह्माकुमारीच्या सर्व साधारकांबरोबरच विशेष परिश्रम घेण्यात– भगवान शंकराची भूमिका करणारे, रमेश पालीवाल-केतन बारमुख- डॉक्टर  कृतिका बारमुख! श्रीराम पवार-  नंदा पवार आणि  प्रमिला शेटे यां सर्वांचा सिंहाचा वाटा होता, उद्घघाटन सोहळ्यातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक- विलक्षण चैतन्यदायी अनुभूती प्रकर्षाने जाणवत होती, आणि हीच या सोहळ्याच्या यशस्वीतेची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!