क्रीडा व मनोरंजन

अजिंक्य कदमची अष्टपैलू कामगिरी डीएससीए चषक क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : अजिंक्य कदमच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पॅब क्रिकेट क्लबने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा १२० धावांनी धुव्वा उडवत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित डीएससीए चषक मर्यादित षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली. सामनावीर ठरलेल्या अजिंक्यने ९३ धावांच्या खेळीनंतर दोन विकेट्स मिळवत छाप पाडली.
पॅब क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकात २७४ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले. अजिंक्यसह हर्ष गायकरने ३९, हर्ष पाटीलने ३८ आणि विजयने २८ धावा करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. ध्रुव गोटी आणि वेदांत मिश्राने प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या साळगावकर स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाजांचा नमन भंडारीच्या भेदक माऱ्यासमोर निभाव लागला नाही. त्यांचा डाव २७ व्या षटकात १५४ धावांवर आटोपला. ध्रुवने फलंदाजीतही लक्ष वेधून घेताना ३० धावांचे योगदान दिले. सोहम किरने २१ धावा केल्या. नमनने सात षटकात ४९ धावा देत सहा फलंदाजांना माघारी पाठवले. अजिंक्य कदमने ११ धावांत दोन विकेट्स मिळवल्या. अंसारी काशीफनेही दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

संक्षिप्त धावफलक : पॅब क्रिकेट क्लब : ४५ षटकात सर्वबाद २७४ ( अजिंक्य कदम ९३, हर्ष गायकर ३९, हर्ष पाटील ३८, विजय २८, ध्रुव गोटी ७-१-३७-४, वेदांत मिश्रा ८-०-३५-४) विजयी विरुद्ध साळगावकर स्पोर्ट्स क्लब : २७ षटकात सर्वबाद १५४ ( ध्रुव गोटी ३०, सोहम किर २१, नमन भंडारी ७-४९-६, अंसारी काशीफ ४.५- ३३-२, अजिंक्य कदम ६-१-११-२)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!