ताज्या घडामोडी

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता.१७ (प्रतिनिधी) : मराठवाडा साहित्य परिषदेच्या उमरगा शाखेच्या वतीने शाखेतील सदस्यांचा सत्कार गुरुवारी (ता. १६) रोजी सन्मान करण्यात आला.
मराठवाडा साहित्य परिषद सदस्य रुपसिंग तुकाराम सगर हे देशी केंद्र विद्यालय लातूर येथे मुख्याध्यापक झाले. प्रा. सोमशंकर महाजन आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून बढती मिळाली तर प्रा. संध्या सगर या याच महाविद्यालयात उपप्राचार्य नियुक्ती झाली. तसेच राजेंद्र सगर यानां यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्था, पुणे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. या त्यांच्या यशस्वी प्रगती निमित्त त्यांचा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाल, ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आदर्श शाळेतील शिक्षक तथा प्रशालेचे पर्यवेक्षक बी. एम. पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच सदर सर्व मान्यवरांचा आदर्श कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्या वतीने ही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. किरण सगर, तात्याराव फडताळे, सैफन शेख, प्रा. संतोष इंगळे, प्रा. अनिल बिराजदार, प्रा. निळकंठ पाटील आदींसह मराठवाडा साहित्य परिषद पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!