ताज्या घडामोडी

सिटीझन वेल्फेयर असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Spread the love

बदलापूरकर शहरवाशीयांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या सिटीझन वेल्फेयर असोसिएशन या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन काल बदलापूर येथील अजयराजा सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्ता गावडे हे होते. शिवजयंती दिवशी हा वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सोहळ्याला सुरुवात झाली. संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री दिलीप नारकर यांनी संस्थेने एक वर्षातील केलेल्या जनकल्याणाच्या प्रशासकीय कामांचा आढावा सादर केला. सिटीझन वेल्फेयर असोसिएशनमार्फत नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत खूप भरीव कामगिरी केल्याचे दिसून आले. वार्षिक आढाव्यासोबतच असोसिएशनच्या भावी ध्येय आणि उद्दिष्टांबद्दल श्री नारकर साहेब यांनी माहिती दिली. सिटीझन वेल्फेयर असोसिएशन ही एक पूर्णपणे अ-राजकीय आस्थापना आहे. या असोसिएशन मध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे लोकं असले तरी या व्यासपीठावर राजकीय वलय बाहेर ठेवून लोकहिताची कामे केली जातात. सामान्य नागरिकांनी असोसिएशन कडे येताना कोणताही भेदभाव मनात न ठेवता सहभागी झाले पाहिजे यासाठी अशी व्यवस्था निर्माण केल्याचे श्री नारकर साहेब यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्ता गावडे यांनी उपस्थितांना शहरातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले. सध्या सर्वात जास्त गुन्हे घडण्याचे क्षेत्र म्हणजे सायबर क्राईम असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर सायबर क्राईम रोखायचे उपायदेखील श्री गावडे यांनी सांगितले. पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच सिटीझन वेल्फेयर असोसिएशनच्या प्रयत्नात आणि उपक्रमात सहभागी राहील असा विश्वास त्यांनी दिला. जागरूक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे काम केल्यास शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदतच होईल आणि त्यासाठी जनजागृतीचे संयुक्त कार्यक्रम करण्याबाबत त्यांनी भाष्य केले. गंभीर घटनांना हलक्या विनोदाची किनार देऊन श्री गावडे यांनी खुमासदासर प्रबोधन केले. संस्थेच्या प्रत्येक कामाला वृत्तपत्रीय प्रसिद्धी देणारे पत्रकार श्री गुरुनाथ तिरपणकर, असोसिएशनच्या प्रत्येक मिटींगला मिनी हॉल उपलब्ध करून देणारे श्री महेश सावंत आणि अजयराजा सांस्कृतिक सभागृहाचे मालक श्री फ्रफु्ल्ल थोरात संस्थेच्या या सदस्यांचे नेहमीच सहकार्य असते आणि त्यांच्या या सहकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी असोसिएशनचे सचिव श्री राजेंद्र नरसाळे यांनी सुरुवातीसून ते वर्धापन दिनाचा समारोप होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी घेऊन प्रत्येक सदस्याला कामे नेमून देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ठ नेतृत्वगुणाची चुणूक आणि सुत्रसंचालनातून उत्कृष्ट वक्तृत्व शैली दाखवून दिली.
असोसिएशनचे सदस्य श्री सुहास सावंत यांनी बदलापूरमधील पूर्वीचा काळ आणि आताच काळ यांची उत्तमरीत्या सांगड घालत आपले मनोगत व्यक्त केले. बदलापूर शहर कसे बदलत गेले आणि शहराने कशी प्रगती केली यावर त्यांनी प्रकाश टाकला. सदस्य डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या कामाचा प्रभाव कसा चांगल्या पद्धतीने शहरातील विविध प्रशासकीय आस्थापणांमध्ये वाढत चालला आहे, आणि भविष्यात असोसिएशन आणखी प्रगत करण्यासाठी उत्तमरीत्या काम करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत मनोगत व्यक्त केले.
संस्कृतीक विरंगुळा म्हणून सदस्य श्री दीपक वायंगनकर यांनी सुंदर आवाजत सदाबहार गाण्यांची वीण जोडून उपस्थितांचे मनोरंजन केले. श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी कविता सादर केली. संस्थेच्या सदस्य डॉ.निता पाटील यांचा मुलगा कु. आर्यन पाटील याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेरणादायी काव्य सादर केले. असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुनील दळवी साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. संस्थेचे पदाधिकारी श्री मंगेश सावंत, विलास सळगावकर, विलास हंकारे, सुहास सावंत, महेश सावंत, दीपक वायंगनकर, सौ. सुवर्णा इसवलकर, श्री प्रफुल्ल थोरात, गुरुनाथ तिरपणकर, डॉ. निता पाटील, डॉ. अमितकुमार गोईलकर, श्री राजेंद्र नरसाळे, एकनाथ गायकर, चंद्रकांत चिले आणि सर्वांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री विलास हंकारे यांनी आभार व्यक्त करून स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!