क्रीडा व मनोरंजन

मुंबई मनपा योगासन स्पर्धा दिमाखात संपन्न

Spread the love

मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग-उपविभाग शारीरिक शिक्षण यांच्यावतीने दुसरी योगासन स्पर्धा ना.म.जोशी मनपा शाळा येथे दि.१४ जुलै ते १७ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ पर्यवेक्षक अनंत आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत मनपा शाळेतील एकूण 570 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा १२ वर्ष,१४ वर्ष व १७ वर्ष अशा तीन वेगवेगळ्या वयोगटात घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे रिदमिक योगासन या संगीताच्या तालावर केल्या जाणाऱ्या योगासनाची स्पर्धा ही या ठिकाणी प्रथमच घेण्यात आली.स्पर्धा कालावधीमध्ये उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी स्पर्धेत भेट दिली व योगासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकाग्रता संपन्न संपादन करून नावलौकिक प्राप्त करावा असे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. दि.१७ जुलै रोजी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मराठी अभिनेत्री सुजाता मराठे,डॉक्टर अमिता भुसारी, पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे,पालघर योगासन असोसिएशन कार्याध्यक्ष रुचिता ठाकूर,मुंबई शहर कराटे असोसिएशन सचिव अरविंद चव्हाण या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेत ९ ते १२ वर्ष मुलांच्या वयोगटात युवराज परमार (नटवर नगर एम पी एस शाळा) व मुलींच्या गटात शिवानी मुंडा (नटवर नगर एम.पी.एस शाळा), १२ ते १४ वर्षे मुलांच्या वयोगटात कृष्णा प्रजापती (पंतनगर इंग्रजी शाळा) व मुलींच्या गटात सोनम गुप्ता (पंतनगर इंग्रजी शाळा), १४ ते १७ वर्ष मुलांच्या वयोगटात रिशी चौरसिया (पंतनगर इंग्रजी शाळा) व मुलींच्या वयोगटात सविता थापा (पि.के रोड शाळा) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. रीदमिक योगासन या प्रकारात मुलांच्या वयोगटात युवराज परमार (नटवर नगर एम पी एस) व मुलींच्या वयोगटात आलिया खान (विलेपार्ले हिंदी) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. मनपा विद्यार्थ्यांमध्ये योगासनांची आवड निर्माण होऊन योगाच्या माध्यमातून विद्यार्थी निरोगी व सुदृढ होऊन त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीची वाढ निर्माण होण्यासाठी त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या योगासन स्पर्धेची पूर्वतयारी करून घेऊन पुढे भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य प्राप्त व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर स्पर्धा संचालित करण्याचे कार्य मुंबई योगासन असोसिएशनचे सचिव महेश कुंभार व पंच कार्य करणाऱ्या त्यांच्या टीमने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी यांनी केले.कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शारीरिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे,प्राचार्य रवींद्र परदेशी,सर्व कनिष्ठ पर्यवेक्षक,शारीरिक शिक्षण शिक्षक व पालक यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!