ताज्या घडामोडी

सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ३ (प्रतिनिधी) : सुंदरवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी (ता. ३) रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील विविध चिमुकल्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करुन सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. शाळेचे मुख्याध्यापक महादेव जगताप, सहशिक्षक व्यंकट भुसार, वैभव कांबळे, संतोष कागे, बालाजी जाधव, श्रीमती सुनीता चव्हाण, सुमित्रा चव्हाण, संगीता माकणे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जनार्दन शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!