आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, आयोजित ‘व्यावसायिक मानसिकता विकास ‘ प्रशिक्षण मालिकेतील 50 वे शिबीर संपन्न..

आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव येथे ज्येष्ठ रोटेरियन. यादवेंद्र खळदे आणि रोटरीच्या माझी जिल्हा प्रांतपाल. रश्मी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला..

Spread the love

आवाज न्यूज :  ‌‌ तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी 10 ऑक्टोबर .

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित ‘व्यावसायिक मानसिकता विकास ‘ प्रशिक्षण मालिकेतील 50 वे शिबीर आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव येथे ज्येष्ठ रोटेरियन. यादवेंद्र खळदे आणि रोटरीच्या माझी जिल्हा प्रांतपाल. रश्मी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

प्रशिक्षण शिबिराची ही मालिका रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अनिश होले आणि यूथ डायरेक्टर भालचंद्र लेले यांनी पार पाडली.

हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय हे करिअर म्हणून निवडावे या उद्देशातून आखण्यात आले असून संपूर्ण मावळात असे 100 हून अधिक कार्यक्रम करून 10000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवन्याचा संस्थेचा मानस आहे.

या 50 व्या कार्यक्रमास रोटेरियन राहूल दांडेकर, विलास शहा, विश्वनाथ मराठे, रिषिकेश कुलकर्णी, विकास उभे, श्रीशैल मेंथे, धनंजय मथुरे आणि विद्यालयातर्फे प्राचार्य देवकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!