ताज्या घडामोडी

देवचंद कॉलेजचा राष्ट्रीय कुस्तीपटू संतोषची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

Spread the love

कोल्हापूर प्रतिनिधी- तुकाराम पाटील

देवचंद कॉलेजचा अर्जुननगर ता कागलचा राष्ट्रीय कुस्तीपटू श्री संतोष हिरुगडे यांची आखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली असून सदर स्पर्धा 7 ते10 मार्च दरम्यान चौदरी बन्सीलाल विद्यापीठ,भिवानी येथे होणार आहेत.
संतोष हिरुगडे याने इचलकरंजी येथे झालेल्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते.संतोष हिरुगडे यांच्या या कामगिरीबद्दल महविद्यालयातील सर्व घटकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.या यशस्वी खेळाडूस जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजानिस सुबोध शहा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ प्रशांत शाह, उपप्राचार्य डॉ.एम.एम.बागवान,जिमखाना प्रमुख प्रा रवींद्र चव्हाण, निरंजन जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.तसेच जिमखाना विभागाचे कर्मचारी संतोष वागळे,वैभव सोनार व सौ. सुवर्णा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!