ताज्या घडामोडी

मराठी विभाग मुंबई विद्यापीठ व बोधी नाट्य परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन आणि परिसंवाद

Spread the love

मुंबई: वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी विभाग मुंबई विद्यापीठ व बोधी नाट्य परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन आणि परिसंवादाचे आयोजन कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन विद्यानगरी या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी “बोली भाषा: चिंता आणि चिंतन” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे संपादक प्रेमानंद गज्वी व डॉ.महेश केळुसकर यांची उपस्थिती होती.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रेमानंद गज्वी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहीजे अशी आमची मोहीम सुरू आहे.आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा हा १ मे महाराष्ट्र दिनी या दिवशीच मिळाला पाहीजे असा आमचा प्रयत्न आहे. असे यावेळी प्रेमानंद गज्वी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठ मराठी विभाग विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. व प्रमूख वक्ते म्हणून प्रा.डॉ अनंत देशमुख देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुरेश मेश्राम यांनी केले.

नीती मेहेंदळे, ऍड मंदाकिनी पाटील ,गिरीश कुंटे, डॉ. अनिल सकपाळ, डॉ विनोद कुमरे, डॉ.श्यामल गरुड,डॉ. सुनील अवचार , डॉ.सुरेश मेश्राम, राजा बाळदकर, अशोक हंडोरे यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!