ताज्या घडामोडी

भय-भुक आणि भीतीचे दबावतंत्र वापरून आंदोलन चिरडले जाणार नाही

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

जाब विचारणारे स्थानिक योग्य नेता तयार झाल्यास समाजात बदल शक्य – लोक संघर्ष च्या नेत्या प्रतिभा शिंदे यानी संघटीत होण्याचे केले आव्हान*

अमळनेर( ) अमळनेर येथिल महत्वपूर्ण स्थानिक प्रश्नांसह विविध विषयांवर समविचारी सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांचा मेळावा लोकसंघर्ष च्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सानेगुरुजी विद्यालयात संपन्न झाला.
“भय,भूक आणि भीतीचे दबावतंत्र वापरून आंदोलन संपवली जात आहेत. पाण्याचा प्रश्न जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत विकासाची पूर्तता होणे शक्य नाही. पुरोगामी म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सर्व प्रश्न सोडवणे शक्य का होत नाही याचे चिंतन होणे गरजेचे आहे. लोकांचा रेटा असल्याशिवाय काम होऊ शकत नाही म्हणून दबावगट वाढले पाहिजेत!१५ एप्रिल ला जळगाव येथील महिला मेळाव्यास खा.शरद पवार यांचे सह आघाडी सरकारमधील आठ मंत्री उपस्थित राहतील तर कार्यक्रमानंतर मंत्री गटासोबत कार्यकर्त्यांना आपले प्रश्न मांडायचे आहेत. स्थानिक पातळीवर ही प्रश्न विचारणारा लीडर तयार झाला पाहिजे” असे प्रतिभाताई शिंदे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले.अशासकीय संस्था,सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था संघटना यांचा समन्वय असणे गरजेचे आहे अशी भूमिका प्रास्ताविकात गौतम मोरे यांनी मांडली.मधल्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय बुडालेत, नोकऱ्या गेल्या, महागाई वाढली, कोविड बाधित कुटुंब,एकल महिला (विधवा) किंवा एकल पुरुष (विधुर) झालेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत.साधा उत्पन्नाचा दाखला मिळण्यासही त्रास सहन करावा लागतो. शासन-प्रशासन प्रतिसाद देत नाही,हमी भाव बाबत फारच निराशा आहे.मार्केट कमिटी शिक्का मारत नाही.बेरोजगार तरुणांसाठी काम झाले पाहिजे.तर शोषक वर्गाच्या कमरेत लाथ मारल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत.असे याप्रसंगी बोलतांना अरुण बापू देशमुख,संदिप घोरपडे,विश्वास पाटील ,चेतन शहा,डी एम पाटील,एस एम पाटील, सुनिल अहिरराव, सोमचंद संदानशिव यांनी मांडले.
विखुरलेल्या स्वरूपात असल्याने आपण संघटितपणे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मा.खा.शरद पवार जळगावला येत आहेत या पार्श्वभूमीवर पिण्याचं पाणी आणि सिंचन साठी महत्वपूर्ण असलेल्या पाडळसरे धरणाचा प्रश्न महत्वाचा असल्याने दिलेला निधी वेळेवर का खर्च होत नाही ,लाखाच्या वर संख्येचा शहरात नगरपालिकेत प्रशासक आहे.लोक प्रतिनिधी नसल्याने कामे योग्य रित्या पार पडत नाही.म्हणून दबावगट असला पाहिजे. असे मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,सुखदेव होलार, रज्जाक शेख, बन्सीलाल भागवत, प्रा डॉ राहुल निकम यांनी व्यक्त केले.
बैठकीचा समारोप करतांना प्रा अशोक पवार यांनी तापीवरील पाडळसे धरण पूर्णत्वास न्यायचे असेल तर नाबार्ड ची किंवा केंद्र शासनाने मदत केली तरच शक्य होईल.
१५ एप्रिल ला जळगाव येथे शेतकरी महिला परिषद यशस्वी करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यात कृती समिती स्थापन करण्याची सूचना मांडली.
या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मंगलसिंग सूर्यवंशी, टेकचंद परदेशी, आर्किटेक्ट चेतन सोनार, भारती गाला,दर्शना पवार,अशोक बिऱ्हाडे, रमेश बोढरे, तुषार संदानशिव, चंद्रकांत जगदाळे, गोकुळ बागुल, मयूर जाधव, शाळीग्राम पाटील, दिलीप ठाकरे, विश्वास पाटील, रियाजुद्दीन शेख, हिरालाल पाटील, बन्सीलाल शिरसाठ, नगरसेवक संजय पवार, वाल्मिक पाटील, उदयकुमार खैरनार, यतीन पवार, नितीन पारधी, अविनाश पवार, हेमंत दाभाडे, हर्षल शेले, पन्नालाल मावळे,आर पी धनगर, प्रणय पाटील, ग्रा पं सदस्य यशवंत बैसाने,प्रा अरुण घोलप, परशुराम महाले, एन आर मैराळे, नरेंद्र बाळू पाटील, रावसाहेब पाटील, उमाकांत ठाकूर, पुरुषोत्तम माळी,प्रा.एम एन संदानशिव,नीता चंदनखेडे,अश्विनी परदेशी, कीर्ती हरहरे,मीनाक्षी संदानशिव, अश्विनी संदानशिव,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!