ताज्या घडामोडी

सह्याद्री खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध : निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथील सह्याद्री खरेदी विक्री संघ या संस्थेची निवडणूक आज सोमवारी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी.एस. खताळ यांनी सोमवारी केली. यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेशाने हा निवडणूक आदेश घोषित करण्यात आला आहे. शिराळा बाजार समिती आवारात निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर झाल्यावर भाजपाच्या सत्यजित देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांचा शिराळा बाजार समिती आवारात जल्लोष केला.

ही निवडणूक सन 2022 23 ते सन 2027 ते 28 अखेर च्या कालावधीसाठी संचालक मंडळाची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.या निवडणुकीत रणजीत शिवाजी ढोले सर्वसाधारण इंग्रूळ, खाशाबा दादा पाटील सर्वसाधारण धामवडे, प्रदीप गणपती कदम सर्वसाधारण उपवळे, शांताराम यशवंत जाधव सर्वसाधारण वाकुर्डे खुर्द, शंकर सखाराम पाटील सर्वसाधारण रिळे, बजरंग सखाराम चरापले सर्वसाधारण मांगले, संपतराव गुलाबराव देशमुख सर्वसाधारण कोकरूड, आनंदराव पांडुरंग पाटील सर्वसाधारण कणदूर शहाजी महिपती बांबवडे सर्वसाधारण टाकवे, रामचंद्र शंकर आटुगडे सर्वसाधारण आटूगडेवाडी, राजाराम श्रीपती खांडेकर सर्वसाधारण मांगरूळ, मानसिंग रामचंद्र पाटील सर्वसाधारण पनुंबरे वारूण,सुनिता संभाजी नलवडे महिला प्रतिनिधी शिराळा, सुनंदा बाजीराव शेडगे महिला प्रतिनिधी शेडगेवाडी, सतीश रामचंद्र सुतार इतर मागास प्रवर्ग सागाव, शिवाजी बाबुराव जानकर विमुक्त जाती भटक्या जमाती बिळाशी, मिलिंद नानासो धर्माधिकारी अनुसूचित जाती जमाती आरळा असे एकूण 17 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.

ही संस्था महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी स्थापन केली असून सध्या या संस्थेचे मार्गदर्शक सत्यजित शिवाजीराव देशमुख असून, गेली अनेक वर्ष या संस्थेला चेअरमन म्हणून संपतराव गुलाबराव देशमुख यांनी मोठी दिशा दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्याने तालुक्यातील देशमुख गटाच्या भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!