ताज्या घडामोडी

भिशीच्या नावाखाली खाजगी सावकारकी करणाऱ्या बसवराज मठपती याला सावकारी प्रतिबंधक विभाग आणि कुपवाड एम.आय.डी .सी . पोलिसांनी केली अटक…

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा)

… सविस्तर असे की , कुपवाड येथे भिशीच्या नावा खाली सावकारी करणाऱ्या बसवराज शिवय्या मठपती याला अटक केली असून त्याच्याकडून रोख ४१ हजार १५० रुपये, आलिशान मोटार कार, कोरे बॉन्ड व कोरे धनादेश जप्त करण्यात आले. सावकारी प्रतिबंधक विभाग आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.
तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी सावकार मठपती हा वार्षिक भिशी सुरू करून त्या भिशीच्या आधारे लोकांना ४ टक्के व १० टक्के दराने पैसे देतो. त्याचे तो मासिक व्याज घेत होता. तो बऱ्याच मजुरांना मासिक व्याजाने पैसे देऊन त्यांचे पैसे भिशीतून वर्ग करून स्वतः वापरत होता.
बऱ्याच लोकांना त्याने २० ते ३० हजार रुपये कर्ज देऊन त्यांच्याकडून दुप्पटीने पैसे वसुली करून घेतले होते. त्याचप्रमाणे तो दमदाटी करून व्याज गोळा करीत होता. सदरच्या या सावकाराच्या त्रासामुळे कर्जदार व्यक्तीने पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सावकारी प्रतिबंधक विभाग आणि कुपवाड पोलिसांनी सावकार मठपतीच्या घरावर आज छापा टाकला असता त्याच्याकडून रोख ४१ हजार १५० रुपये, मोटार तसेच कोरे धनादेश व कोरे बॉन्ड असा ८ लाख ४१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील, सावकारी प्रतिबंधक विभागाचे उपनिरीक्षक आर. एफ. मिरजे, विभागामधील पोलिस मदुसदर पाथखट, संदीप पाटील, फौजदार युवराज पाटील, सतीश माने, प्रताप पवार, अरुणा यादव, सूरज मुजावर यांनी ही कारवाई केली. सावकार मठ पतीला अटक केल्यानंतर सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे मात्र या खाजगी सावकारी तडाख्यातून आता तरी सर्वसामान्य लोकांचा छळ थांबणार का , अशी चर्चा आता कुपवाड परिसरात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!