ताज्या घडामोडी

वाटेगाव प्रा.आरोग्यकेंद्र इमारत उदघाटन व लोकार्पण सोहळा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

वाटेगाव (ता. वाळवा) शिराळा मतदार संघातील वाटेगाव येथे दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन व लोकाअर्पन आज संपन्न झाले. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बेँकचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते फित कपून व श्रीफळ फोडून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार प्रदिप उबाळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, राहूल चव्हाण, संपतराव पाटील, सुरेश जाधव, अशोक पाटील, विनोद जाधव, रमेश साळुंखे, कष्णात नलवडे, मधुकर कुंभार, बाळासाहेब कुंभार, वैद्यकीय अधिकारी राजेंद्र भिसे, वैद्यकीय अधिकारी तेजश्री कुंभार, भरत देशमुख, हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!