ताज्या घडामोडी

विप्रो कंझुमर केअर अमळनेर व आधार बहुद्देशिय संस्था अंमळनेर यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणी शिबिराचे आयोजन.

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

विप्र कंझुमर केअर अमळनेर व आधार संस्था अंमळनेर मार्फत ग्रामीण-शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणी शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन आज बालाजी विद्यालय गांधली-पिळोदे येथे करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन विप्रोचे जनरल मॅनेजर श्री. विजय बागजीवाला यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विप्रोचे,श्री.मिलिंद मरकंडे (स्टोअर अँड पर्चेस मॅनेजर),श्री.आनंद निकम (अकाउंट मॅनेजर),श्री.सुधीर बडगुजर(वेल्फिअर ऑफिसर) आधार संस्थेच्या डॉ.भारती पाटील व श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होते. विजय बागजी वाला यांनी उद्घाटन पर मनोगतता , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावर्षी अमळनेर येथील विप्रो कंपनी देखील आपला अमृत महोत्सव साजरा करत असून, विप्रोचा अमळनेरातून सुरू झालेल्या प्रवास हा जागतिक स्तरावर पर्यंत असून समाजाचे देणे म्हणून अमळनेर येथे अनेक सामाजिक कार्यक्रम आधार संस्थेसोबत राबवित असल्याचे सांगितले डॉ. भारती पाटील यांनी डोळे तपासणी कार्यक्रमाची माहिती दिली तालुक्यातील वीस ग्रामीण माध्यमिक शाळेमध्ये हा उपक्रम प्रथम टप्प्यात राबविला जाणार असूनत्यात तज्ञकडून मुलांचे डोळे तपासून नंतर ज्यांना चष्मा असेल त्यांना चष्म्याचे देखील वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच ज्या मुलांना डोळ्यांच्या गंभीर तक्रारी आढळून येतील त्यांना पुढील उपचारासाठी मदत करण्यात येईल असे सांगितले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारच्या कार्यक्रम समन्वयिका अश्विनी भदाणे, दीप्ती शीरसाठ, यासमिन शेख, निकिता पाटील, मयुर गायकवाड उपस्थित होते. बालाजी विद्यालय गांधी पिळोदा येथील मुख्याध्यापक श्री एस व्हि पाटील इतर शिक्षक वृंद यांनी सहकार्य केलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!