क्रीडा व मनोरंजन

शालेय कबड्डी स्पर्धांना शुभारंभ, तालुका स्पर्धेत सफाळे विभागाचे वर्चस्व

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर आयोजित पालघर तालुकास्तरीय १४,१७ व १९ वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धा डॉ. स. दा. वर्तक विद्यालय बोईसर मैदानावर शुक्रवारी (ता.१८) उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धांचे उद्घाटन पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॅरेल डिमेलो यांच्या हस्ते झाले. यावेळी पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष तथा पतपेढीचे संचालक विलास पाटील, पालघर तालुका केंद्रप्रमुख राम पाटील, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजय पाटील, उपकेंद्र प्रमुख कमळाकर पाटील, आशिष पाटील, पराग पाटील, नरेंद्र घरत, मयूर पाटील, संदेश सातवी, समीर पिंपळे, प्रकाश पळसुळे, किरण थोरात आणि विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

गेली दोन वर्ष बंद असलेल्या शासनाच्या शालेय स्तरावरील विविध स्पर्धा सुरू झाल्या असून पालघर तालुक्यातील तालुका क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ आत्ताच झाला आहे. या शालेय स्पर्धांमधील दोन दिवस झालेल्या कबड्डी स्पर्धांमध्ये पालघर तालुक्यातील ९७ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्ये सफाळे विभागाने बाजी मारली असून सहा फायनल पैकी पाच फायनल मारून अंतिम विजेते ठरले असून दोन गटात अंतिम उपविजेते ठरले आहेत. प्रो कबड्डी च्या स्पर्धांचा या स्पर्धांवर चांगला परिणाम दिसून येत असून प्रत्येक शाळेचे वेगवेगळ्या खेळाच्या गणवेशात असलेले संघ लक्ष वेधून घेत होते. तालुका स्पर्धांमध्ये विजेत्या संघांना जिल्हा स्तरीय स्पर्धेत खेळावे लागेल.
या स्पर्धांमधील विजेते संघ
१४ वर्षे मुली…
१.राजगुरु ह.म. पंडीत, विद्यालय सफाळे
२.सी.सी. श्रॉफ इंग्रजी माध्यम सफाळे
१४ वर्षे मुले….
१.सी. सी.श्रॉफ इंग्रजी माध्यम सफाळे
२.स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे
———————–
१९ वर्षे मुली….
१. स्व. निखिल राजन घरत ज्युनियर कॉलेज सफाळे
२.सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर
१९ वर्षे मुलगे …
१. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर
२. स्व निखिल राजन घरत ज्युनियर कॉलेज सफाळे
————————————–
१७ वर्षे मुली…
१. त्रिमूर्ती विद्यालय माकणे
२. भुवनेश कीर्तने विद्यालय माहीम
१७ वर्षे मुलगे….
१. राजगुरू ह.म. पंडित विद्यालय सफाळे
२. स्व. विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!