महाराष्ट्र

आपण कर्तव्यावर असणार्‍या पोलीसांची काळजी घेत आहात, हे महान कार्य आहे – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

Spread the love

चिंचवड : येथील प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कर्मचार्‍यांना 500 रेनकोट्स स्विकारताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन्स क्लबचे प्रांतपाल ला. हेमंत नाईक, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष ला. दीपक बाळ सराफ, लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या मावळत्या अध्यक्षा ला. राजेश्री शहा, ला. गौरव शहा, ला. राजेंद्र जोरे, लायन्स क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष ला. विक्रम माने, ला. हिरामण गवई, ला. वसंत गुजर, महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, प्रतिभा व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, डॉ. वनिता कु्ऱ्हाडे, डॉ. हर्षिता वाच्छानी आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश पुढे म्हणाले की, नागरीकांनी पोलीसांच्या खाकी वर्दीकडे पाहिल्यावर स्व:त आत्मनिर्भर होतात, आपली काळजी घेणारे खाकी वर्दीतील माणूस आहे, याची जाणीव होते. तो दिवस रात्र, ऊन, वारा, पावसात आपले कर्त्यव्य बजावत असतो. त्याची काळजी आपण करता ही कौतुकास्पद बाब आहे. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. आपली प्रकृती उत्तम कशी राहील याची काळजी घेतली पाहिजे. स्पर्धा स्वत:बरोबर करा. प्रत्येकाने देशाभिमान अंगीकारावा. प्राध्यापकांना उद्देशून ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्याच्या मदतीला पुढे या, उद्याचे आदर्श नागरिक घडवा. प्रत्येकाबाबत आत्मीयता बाळगा, पंडीत जवाहरलाल नेहरूंनी म्हटले, जमीन, पाणी, घरे, कार्यालये ही भारत माता नसून, भारतमाता नसून भारतात हजारो वर्षांपासून राहणारे सामान्य भारतीय हेच भारतमाता आहे असे मी मानतो. सर्वच जातीधर्माच्या लोकाबद्दल आत्मीयता बाळगून वेळोवेळी प्रसंगात त्याची मदत करणे हेच भारतमातेची सेवा करण्यासारखे आहे. आज प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लब यांनी पोलिसांची सेवा केली आहे. समाजातील इतर घटकांतील पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

यावेळी जीटीटी फाउंडेशन आणि बर्कलेजचे व्यवस्थापक नवनीतकुमार यांच्या वतीने महाविद्यालयातील 500 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे राशन किट प्राथमिक स्वरुपात देण्यात आले.

प्रास्ताविकात कमला विकास संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लबच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करून समाजाप्रतीची आमची बांधिलकी कायम यापुढेही राहील असे निक्षून सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या आवडत्या क्षेत्रातील आवड ओळखून तज्ञाकरवी वेळोवेळी मार्गदर्शन, प्रशिक्षण देत भविष्यात आदर्श नागरिक घडविण्यासाठी संस्था कटीबद्ध राहील याची ग्वाही त्यांनी दिली.

लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक म्हणाले, पोलिसांनी कोरोना प्रादुर्भाव काळात जी भूमिका निभावली ते जनता कदापि विसरू शकणार नाही. त्यांच्यासाठी काहीतरी करावे या प्रामाणिक भावनेतून त्यांना रेनकोट देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. महिलांच्या आरोग्याबाबत लायन्स क्लब विविध कार्यक्रम राबवीत असून विविध आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्य शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी स्वागतात संस्था व विविध उपक्रमांची सखोल माहिती दिली. पाहुण्यांची ओळख मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा गोगटे यांनी तर, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!