ताज्या घडामोडी

आनंदी गुरुकुल चे चार विद्यार्थी झळकणार ‘सोनी मराठी वाहिनी’वरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेत

Spread the love

अकोला(दि.३):
येथील प्रा.दीपाली आतिश सोसे यांनी स्थापन केलेल्या आनंदी गुरुकुल अँक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्राचे हरहुन्नरी विद्यार्थी कलाकार अनिरुध्द जळगावकर,अनिकेत गौरकार,निरंजन खेळकर आणि अमिता जळगावकर यांचे नुकतेच पुणे येथे चित्रिकरण झाले असून लवकरच त्यांच्या भुमिका असलेल्या भागाचे प्रसारण होणार असून अकोल्यातील विद्यार्थी सातत्याने विविध चित्रपट,मालिका,लघुपट,वेबसिरीज च्या माध्यमातून आनंदी गुरुकुल या संस्थेमुळे अभिनय प्रशिक्षण घेऊन झळकत असल्याची भावना विद्यार्थी व पालकांनी यावेळी व्यक्त केली.
आजपर्यंत सोनी मराठी वाहिनीवरील ‘ती फुलराणी’,झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’,स्टार प्रवाहवरील ‘तुझेच गीत गात आहे’,’दख्खनचा राजा ज्योतिबा’,सन मराठीवरील ‘आभाळमाया’,शेगावीचे संत गजानन आणि आता पुन्हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’या मालिकेत विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आजवर विविध वाहिन्यांवरील मालिकांसोबतच हिंदी,मराठी,तमिळ,तेलुगु चित्रपटांमधून तसेच अमॅझाॅन प्राइम,नेटफ्लेक्स तसेच ओटीटी प्लॅटफाॅर्मवरील चित्रपट,होस्टेल डेझ सारख्या नामांकित वेबसिरीजमधूनही अभिनय केला आहे.प्रख्यात अभिनेते सलमान खान,शाहरुख खान,नवाजुद्दीन सिद्दीकी अशा दिग्गज हिंदी कलाकारांसह सयाजी शिंदे,दिलीप प्रभावळकर,गिरिश कुलकर्णी अशा अनेक मान्यवर कलाकारांसोबत तसेच नुकतीच मराठी चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत आनंदी गुरुकुलचा विद्यार्थी अनुप फाले यानेही मराठी चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच केले असून अभिनय गुरु दीपाली सोसे यांच्यामुळे आनंदी गुरुकुल च्या विद्यार्थ्यांना मिळालेली संधी अकोला जिल्ह्यासाठी नक्कीच गौरवास्पद असल्याची प्रांजळ भावना विद्यार्थी पालकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!