ताज्या घडामोडी

रोज सकाळी वाट पाहे, चिऊताईची अंगणात कुठे हरवले पाखरांचे, चिवचिव रानावनांत…

Spread the love

आजच्या डिजीटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. परिणामी पशु-पक्ष्यांचा निवारा संकटात आला आहे. विविध जागतिक दिन केवळ नावापुरतेच आहेत का? असा प्रश्न पडावा, ते शोपुरतेच साजरे करण्यापेक्षा वन्य जीवांच्या चारा-पाण्याची सोय करणे, पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निर्सगावर आक्रमण केल्याने गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत. वाढत चाललेले उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडे झुडुपे, दुर्मीळ होत असलेले पाणीसाठे यामुळे मुक्या वन्य प्राण्याना जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
मुक्या पशू- पक्ष्यांची संवेदना समजून घेऊन सोशल तरूणाई फाऊंडेशनची सदस्या मालेगांव येथील पक्षीप्रेमी कु. स्वप्ना बोरसे व ५ वर्षाची चिमुकली हिरण्या पिंगळे यांनी आपल्या शिरसोंडी गावामध्ये विविध ठिकाणी व झाडांवरती पक्ष्यांना धान्ये व पाणी देत आहे. तिला ही कल्पना सहज सुचली आणि दोन दिवसात वापरून पडलेल्या अनेक बाटल्या गोळ्या केल्या अनेक झाडांना बांधल्या त्यात एका बाटलीमध्ये धान्ये व दुसऱ्या बाटलीमध्ये पाणी अशी व्यवस्था केली. आणि हे फक्त तिच एका दिवसासाठी मर्यादित नाहीय तर दररोज सकाळी पक्ष्यांसाठी पाणी व धान्य देणं हा दोघीचा दिनक्रम ठरलेला आहे. स्वप्ना बोरसे हिचं म्हणणं आहे की,”पक्ष्यांसाठी घराबाहेर दाणा पाणी ठेवा’ असे संदेश फक्त नावापूरतेच सोशल मीडियावर फिरू लागतात. पण संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे पशु-पक्षी कमी होऊ लागले आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून चिमण्यांसाठी व पशुपक्ष्यांसाठी दाणा व चारा पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. जंगलात ठिक ठिकाणी पाणवठे बांधणे तसेच जंगली वन्यप्राण्यांची खाण्याची व्यवस्था करणे.गावात गुराढोंरासाठी सार्वजनिक हौंद बांधून पाण्याची व्यवस्था करणे यामुळे बरेचसे प्रश्न सूटतील.

शासनाने ठरवून दिलेला चिमणी दिन, पर्यावरण दिन, जलदिन हे दिनविशेष एक दिवस जागृती किंवा हे दिन साजरे केल्याने पशु पक्षी बचावणार नाहीत. त्यासाठी समाजजागृती होऊन प्रत्येक तरूणाने पुढे येऊन पुढाकार घ्यायला हवा. सध्याच्याय परिस्थितीची जाण ठेवून प्रत्येकाने मुक्या पशू – पक्ष्यांसाठी चारा पाणी व धान्ये देणे खुप गरजेचं आहे. उन्हाच्या झळा आपल्या सहन होत नाही तर त्यांना सहन होईल का? नाही ना… म्हणूनच खास करून तरुणाने पुढाकार घ्यायला हवा. असे आवाहन सोशल तरूणाई फाऊंडेशन सर्वांना करीत आहेत.

लेखक आणि शब्दांकन,
– तुषार महाजन. पत्रकार शिर्डी
( प्रसिद्धीप्रमुख – सोशल तरुणाई फाउंडेशन )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!