नारशिंगे गावची कु. तेजस्वी रविंद्र आग्रे हिची ६९ व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत निवड
जाकादेवी/वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील नारशिंगे गावची तेजस्वी रविंद्र आग्रे या खेळाडूची ६९ व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड झाली. आहे .रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात तिची निवड झाली झाल्याने तिचे क्रिडाक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
तेजस्वीला तिचे वडील रविंद्र आग्रे, आई मीनाक्षी आग्रे,भाऊ शेखर आग्रे,शरद आग्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच तिची बहीण कु. रश्मी आग्रे हिने तेजस्वीसोबत श्री सोमेश्वर प्रतिष्ठान, विल्ये संघाकडून खेळताना विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सरावासाठी मदत केली. तेजस्वीला क्रीडाप्रेमी श्री. आशिष सावंत व श्री. संतोष सनगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दि.२८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत काल्हेर, भिवंडी, जि. ठाणे येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डेरवण येथील सराव शिबिरात ती सहभागी झाली आहे. रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल जाकादेवी पंचक्रोशी व नारशिंगे ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.