ताज्या घडामोडी

नांदिवडे(अंबूवाडी)गावचे सुपुत्र गुरूनाथ सुर्वे यांना रत्नदुर्ग कोकण गौरव पुरस्कार प्राप्त

Spread the love

रत्नागिरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “जय मल्हार सामाजिक चॅरि. ट्रस्ट महाराष्ट्र ” आणि ” शिवांगी नृत्यमल्हार रत्नागिरी” यांनी राज्यभरातील विविध क्षेत्रातील सन्मानमुर्तींना गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले.
रत्नागिरीतील नांदिवडे गावचे सुपुत्र प्रा. गुरूनाथ वसंत सुर्वे यांना सुप्रसिध्द अभिनेत्री किशोरी अंबिये यांच्या हस्ते “रत्नदुर्ग कोकण गौरव पुरस्कार” देवून गौरविण्यात आले .शैक्षणिक, सामाजिक, सास्कृतिक, राजकीय तसेच साहित्यक्षेत्र अशा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. समाजामध्ये जगत असताना गुरूनाथ सुर्वे यांनी विविध भूमिका बजावल्या. नाट्य क्षेत्रात काम करत असताना अनेक नाटकं, पथनाट्यातून अभिनय केला आहे. साहित्यलेखनाची आवड असून कविता संग्रह प्रकाशित झाला आहे तर काही लेखन प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शिक्षकाची भूमिका बजावत असताना त्यांनी सरपंच होण्याचा देखील मान मिळवला आहे. कोरोना कालखंडात चांगली कामगिरी करून कोविड योद्धाचा सन्मान मिळवला.
याआधी त्यांना सन २००० चा शालेय केंद्रस्तरावरील “आदर्श छात्र” पुरस्कार , सन २०१२ ला “आदर्श विद्यार्थी” आणि सन २०१७ ला “सह्याद्री लोकरत्न” पुरस्कार प्राप्त झाला आहे.सर्वत्र गुरूनाथ सुर्वे यांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!