ताज्या घडामोडी

भराडी येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी केली नमाज अदा

Spread the love

एकमेकांची गळाभेट घेऊन दिल्या ईदच्या शुभेच्छा

सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्त नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.
‌ यावेळी भराडीसह परिसरातील गावातील‌ अनेक मुस्लिम समाज बांधव‌ ईदगाह मैदानावर एकत्रीत आल्यानंतर मोईन मौलाना यांनी नमाजचे‌ पठण करून नमाज अदा केली.
अक्षय तृतीया व रमजान‌‌ ईद‌ दोन्ही सण एकाच दिवशी असल्यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे हे ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील भराडी येथील ईदगाह मैदानावर स्वतः हजर होते. यावेळी मे‌हेत्रे यांनी पोलीस दलाच्या वतीने ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना‌ गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे, भराडी बीट जमादार यतिन कुलकर्णी‌ यांच्यासह डी ए इंगळे, टी बी टारपे, एम वाय आरके, ए के सूर्यवंशी, पि वाय शहा यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सरपंच पप्पू जगणाडे, उपसरपंच गजानन महाजन, ग्रामपंचायत सदस्य अनीसखा पठाण, तलाठी काशीना थ ताठे, मंडळ अधिकारी गवळी यांच्यासह मुस्लिम समाज बांधव व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!