ताज्या घडामोडी

माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य भेट

Spread the love

खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयातील सन १९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य म्हणून कपाट व शैक्षणिक फी म्हणून रोख १० हजार रुपये देवून समाजाचे पुढे आदर्श ठेवला आहे.या बॅचचे विद्यार्थी संतोष दबडे,अमोल जावळकर,लहू पोळेकर,दत्ता दबडे,गुलाब भोंडेकर,स्वप्निल जावळकर,चेतन जावळकर,संतोष जावळकर,तानाजी भोसले,महेश तिपोळे,विशाल पवार,पर्यवेक्षक दिपककुमार यादव,भीमराव आदलिंग,अपर्णा वाघमारे आदी उपस्थित होते.माजी विद्यार्थी म्हणाले की आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी असून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही करू शकलो याचे समाधान वाटते तसेच गुरूवर्य शशिकांत जाधव सर हे नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतात असेही ते म्हणाले.विद्यालयाला शैक्षणिक साहित्य व फी दिल्याबद्दल सन १९९९-२००० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक म्हाळसाकांत खेडेकर यांनी केले.शैक्षणिक साहित्य मिळविण्यासाठी जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले.कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!