ताज्या घडामोडी

बिरोबा देवाचे दर्शनानंतर आरेवाडी, कोळे, किडेबिसरी या गावांत महापौर दिग्विजय सुर्यवंशी व नगरसेवक विष्णू माने यांची सदिच्छा भेट.

Spread the love

आरेवाडीच्या बिरोबाच्या यात्रेच्या मुख्य दिवशी सांमिकु महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि नगरसेवक विष्णू माने यांनी सायंकाळी बिरोबा देवाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर बिरोबा देवस्थान समितीवतीने महापौर, नगरसेवक, डॉ. गावडे साहेब, उद्योजक बालाजी पाटील व सामाजिक कार्यकर्ते निवांत कोळेकर सर यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
त्यानंतर आरेवाडी, कोळे व किडेबिसरी गावी सदिच्छा भेटी घेतल्या.

कोळे येथे ग्रामस्थांनी स्मागत केले.राजमाता उद्योग समुह आणि बालाजी उद्योग समुह वतीने राजमाता ग्रामीण बिगरशेती पतसंस्था कोळे या पतसंस्थेच्या कार्यालयात मान्यवरांचा सत्कार करणेत आला. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, डॉ. गावडे साहेब, अॅड दह्याप्पा आलदर, कुंडलिक आलदर सर यांनी मनोगत व्यक्त केले.

माणगंगा साखर कारखान्याचे संचालक मा. राजेंद्र देशमुख, मा. देशमुख सर यांनी त्यांचे कार्यालयात सत्कार व चहापान नियोजन केले.
पतंगराव कदम शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा. दिपक माने, सचिव अमोल माने, संचालक शरद माने, सरपंच शहाजी हातेकर, राजमाता ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष कुंडलिक आलदर सर, सचिव ज. पा. माने सर, उद्योजक सुरेश आलदर, रमेश कोळेकर, ग्रा. पं. सदस्य विजय आलदर, शरद कोळेकर, बापुसो माने, पत्रकार जगदिश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
किडेबिसरी येथे सरपंच डॉ. प्रकाश कोळेकर यांचे घरी माजी जिल्हापरिषद सदस्य मा. गजेंद्र कोळेकर, नागज गावचे उरसरपंच मा. विजय मंगवडे, उद्योजक श्रीमंत खरात, आप्पासो माने, सोपान आटपडकर यांचे हस्ते महापौर व सर्व मान्यवरांचा सत्कार करणेत आला.
यावेळी दादा लोखंडे, अनिल कोळेकर, अरुण कोळेकर, गजानन कोळेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!