ताज्या घडामोडी

इस्लामपूर शहरातील नेहरूनगर, आनंदनगर परिसरातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या एका महिन्यात सोडविली

Spread the love

इस्लामपूर दि.४ प्रतिनिधी
इस्लामपूर शहरातील नेहरूनगर, आनंदनगर परिसर राहणाऱ्या महिलांनी या परिसरातील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या एका महिन्यात सोडविल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांचे जाहीर आभार मानले. एका महिन्यात आम्हास पिण्याचे पाणी देवू,हा आपण दिलेला शब्द एका महिन्याच्या आत पूर्ण करून आमची पिण्याच्या पाण्याची वणवण थांबविली,अशा भावना या महिलांनी ना.पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या.
ना.पाटील यांनी नेहरूनगर व आनंद नगरास भेट देवून या भागात केलेल्या नवीन पाईप लाईनच्या कामाचे उदघाटन केले. यावेळी या महिलांनी या कामाबद्दल कृतज्ञता व समाधान व्यक्त केले. या परिसरात गेल्या एक-दीड वर्षापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ना.पाटील यांनी एका महिन्यांपूर्वी या परिसरास भेट दिली असता,महिलांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणली होती. तेंव्हा ना.पाटील यांनी महिन्यात तुम्हास पाणी देवू, काळजी करू नका,असा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला.
यावेळी इस्लामपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे,माजी नगराध्यक्ष चिमणभाऊ डांगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी सभापती खंडेराव जाधव,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,पिरअली पुणेकर,युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी,दादासाहेब सुर्यवंशी तसेच त्या परिसरात राहणारे चंद्रकांत धुमाळे,अनुप वायदंडे,सिद्धू सावंत,महेश राठोड,सुभाष भंडारी,अरुण माने,सुनील राठोड,सतीश पवार,दिगंबर पाटील व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते. इस्लामपूर येथील नेहरूनगर व आनंदनगरमधील नवीन पाईप लाईन च्या उदघाटन प्रसंगी ना.जयंतराव पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे,अँड चिमण डांगे, शहाजी पाटील,खंडेराव जाधव,विश्वनाथ डांगे,पिरअली पुणेकर,सचिन कोळी व नागरिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!