ताज्या घडामोडी

मांगले येथील शिक्षक मारहाणीची चौकशी करा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
मांगले (ता. शिराळा) येथील आदर्श शिक्षक दगडू शंकर पाटील यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी यासाठी मा. तहसिलदार, शिराळा व मा. पोलीस निरीक्षक, शिराळा यांना संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती, शिराळा तालुका प्रवासी संघ‌‌‌, शिराळा तालुका कामगार परिषद, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आदी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मा. नायब तहसिलदार महाजन आणि ठाणे अंमलदार हरीश चितळे यांनी निवेदन स्वीकारले.
शिक्षक दगडू पाटील यांना वर्गात जाऊन करण्यात आलेल्या मारहाणीचा प्रकार गंभीर तसेच सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या जि.‌प. शाळा आणि शिक्षकांचे मनोबल खच्ची करणारा आहे. याचा सर्व संघटनांनी तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली. निवेदनावर मानसिंग पाटील, मनोज कदम, अमर पाटील, बाजीराव पाटील, सचिन पाटील, सागर पाटील, प्रताप कांबळे, सागर के. पाटील, राजेंद्र लुगडे, प्रतिक पाटील, शिवाजी पाटील, रामचंद्र पाटील, गणेश यादव, राम पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यविजय भोसले, महेश माने, मारुती रोकडे, श्रीराम नांगरे- पाटील, अमोल पाटील, कैलास देसाई आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!