क्रीडा व मनोरंजन

माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयातील दोन मुलींची राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड

Spread the love

दि.१८ डिसेंबर रोजी परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी गोगटे कॉलेज रत्नागिरी येथे घेण्यात आली.यामधून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला त्यामध्ये मा. विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयातील १८ वर्षांखालील कुमारी शिवानी सखाराम गोरे व २०वर्षाखालील कुमारी अनुष्का अनिल चौगुले या दोन मुलींची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.या मुलींना मार्गदर्शन सौ. अर्चना खानविलकर ( सावंत) व श्रीमती पल्लवी बोरकर मॅडम यांनी केले.
या विद्यार्थ्यानींचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थाचालक , मुख्याध्यापक, पर्यवेक्षक , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थि यांच्याकडून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!