आपला जिल्हाराजकीय

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून किशोर आवारे कुटुंबीयांचे सांत्वन..

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.चंद्रकांतदादा पाटील.

Spread the love
  1.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून किशोर आवारे कुटुंबीयांचे सांत्वन, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.  चंद्रकांत पाटील.Guardian Minister Chandrakant Patil consoled the families of the juvenile strays, strict action will be taken against the culprits. Chandrakant Patil.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ मे.

मा. नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांच्या कडून आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी, तर पत्नी आवारे यांची तपास विषेश पथकाकडे सोपविण्याची मागणी.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष. व प्रसिद्ध उद्योजक किशोर आवारे यांची दिनांक १२ मे रोजी निघृण पणे नगरपरिषदेच्या आवारात हत्या झाली होती. या प्रकरणामुळे मावळात  खळबळ उडाली होती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी किशोर आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच किशोर आवारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी “माझा मुलगा तळेगावकरांची निस्वार्थ सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन  दिले. यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!