आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

पंढरीचा वारकरी व विधानसभेचा मानकरी हे ख-या अर्थाने शोभावे , असे वर्तन कै.माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे दादा यांचे होते: आमदार राम शिंदे.

कै.माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे दादा यांच्या शोकसभेस मान्यवरांची श्रध्दांजलीपर भाषणे.

Spread the love

पंढरीचा वारकरी व विधानसभेचा मानकरी हे ख-या अर्थाने शोभावे , असे वर्तन कै.माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे दादा यांचे होते: आमदार राम शिंदे.

आवाज न्यूज :  लोणावळा प्रतिनिधी, ११ डिसेंबर.

पंढरीचा वारकरी व विधानसभेचा मानकरी हे ख-या अर्थाने शोभावे , आसे वर्तन कै.माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे दादा यांचे होते. या शोकसभेत माता , भगिनी आणि मान्यवरांनी माझ्या जिवनात बदल घडण्यासाठी मा.आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचा मदतीचा हात कसा होता , हे अनेकांनी सांगितले.एवढ्या मोठ्या संख्येने श्रध्दांजली सभेसाठी लोक येतील , असे नाही. तीन वक्ते जे एकमेकांच्या विरोधात लढले , पण आज या शोकसभेत येऊन श्रध्दांजलीपर भाषणातून कै.दिगंबरशेठ यांचा मोठेपणा वर्णन करीत आहेत,हे चिञ वेगळे आहे.

शिंदे पुढे म्हणाले ,एक हाडाचा शेतकरी , संघाचा , हाडाचा जनसंघाचा कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता आविरतपणे ७५ वर्षे समाजिक व राजकीय जिवनात सर्वांचे सुखदुःखात सहभागी होतो , शेतकरी व सामान्य माणूस यांची निपक्षपणे कामे करतो , प्रमोद महाजन , गोपीनाथजी मुंढे , नितीन गडकरी यांचेकडून कामे करत असताना अजितदादा असो किंवा विलासराव देशमुख यांचेकडून काम करून घेत तालुक्यातील समस्या सोडवून कामे मार्गी लावतो.

माणूस जन्माला येतो , मेल्याशिवाय रहात नाही , पण दिगंबरशेठ यांच्या सारखे जीवन आणि पंढरीचा वारकरी व विधानसभैचा वारकरी ही उपमा खरी करून दाखवतो..
कै.वाडेकर साहेब यांचेबरोबर चांगले काम केले. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती , जिल्हा परिषद सदस्य ते दोनवेळा विधानसभा आमदार अशी मजल मारली , निस्वार्थी कामामुळे ! ! त्यांनी दहा लाख कर्ज घेवून पहिली आमदारकीची निवडणूक जिंकली. माजी आमदार गाडेपाटील यांनी केवळ सहा हजारात निवडणुकीत विजय मिळवला.आज हे चिञ पहायला मिळत नाही.

मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे म्हणाले , स्वत:चा डबा घेऊन येणारे आमदार मी त्यांचेरूपाने पाहिले.
त्यांनी कधी कुणावर व्यक्तीगत टीका नाही की सार्वजनिक सभा , मधे टीका नाही केली.राजकीय शेकडो राजकीय लोक पाहिले , पण दिगंबरदादांसारखे व्यक्तीमत्व पाहिले नाही.
आयुष्यात माणूस किती कमवतो ;पण १ रूपयाचे नाणेही घेऊन जात नाही.माझे माझे इथेच राहते..! !

आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारूतीबुवा कु-हेकर, यांनी माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचेबद्दल श्रध्दांजलीपर संदेश पाठवलेला कीर्तनकार तुषार महाराज दळवी यांनी वाचून दाखवला.
ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर , आळंदी देवस्थानचे विश्वस्थ यांनी इंद्रायणीनदी वाडिवळे संगम ते आळंदी आणि चंद्रभागेपर्यत पंढरपूर पर्यत प्रदूषणमुक्त व्हावी , आसे १९८४-८५ मधेच प्रयत्न केल्याचे भाषणात सांगितले .राजकारणाचे मधे सात्त्विकता असावी , कुलवान पुरूषाची ज्ञानदेवांनी लक्षणे ओवीत सांगितली आहेत..त्या ओव्या सांगून दिगंबरशेठ यांचे सात्विक व निस्वार्थी कामाचे कौतूक केले.

माजी राज्यमंञी बाळाभाऊ भेगडे यांनी कार्यकर्त्यांनी आपला ता.३१ डिसेंबर रोजीचा वाढदिवस साजरा न करता ; माजी दिगंबरशेठ भेगडे यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करणारे , श्रध्दांजलीपर फलक गावोगावी लावावेत , असे कार्यकर्त्याना आवाहन केले.

माजीमंञी मदनशेठ बाफना म्हणाले , माजी व दिगंबरदादा यांची कुठेही समारंभात भेट झाली ,तर ते मला जवळ बसायला बोलावत..विचारपूस करीत.
बैलगाडा शर्यतीसाठी आण्णासाहेब यांनी मदत मागितली आसता; मी तत्काळ दिली. नंतर ते आभार मानायला घरी आले..पक्षाशी निष्ठा ठेवा , ती दिगंबरशेठ सारखी असावी ! ते सर्वांशी सलोखा ठेवून वागत , आजितदादा असो , की विलासराव सर्वांशी चांगले संबंध होते.
कसे राजकारण करायचे , ते दिगंबरदादा यांचेकडून शिकावे.
माझ्याविरोधात ते निवडणूक जिंकले तेव्हा , मी त्यांना फोनवर सांगितले..बुथवर ते हजर नव्हते , मी होतो.

आमदार. सुनिल शेळके म्हणाले , दादांच्या निधनाची बातमी ऐकून आचानक धक्का बसला.दादांनी न.पा.ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हापरिषद , ते आमदार असे काम केले राजकीय जोडे आपण बाजूला ठेवून एकञ आल्यास हा सुनिलआण्णा दोन नाही चार पावले मागे घेईल. भाजपातून सुनिलआण्णा यांना तिकीट द्या , असे एकमेव दिगंबरदादा भेगडे यांनी म्हणणे मांडले.रविआप्पा भेगडे यांच्याकडे व कुंडावर यायचा योग कै.दिगंबरदादा यांचेमुळे आला..तालुक्यात समतल वातावरण ठेवण्याचे काम दादांनी केले.! !

आर.पी.आय.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. सूर्यकांत वाघमारे म्हणाले, टोकाची टीका करणाऱ्यांना आपुलकीने वागणूक देणारे , आजातशञू म्हणजे माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे होय!.

माजी जिल्हा परिषद सदस्य पै.चंद्रकांत सातकर म्हणाले, ”आमदारकीला मी व तिघांमधे फाईट झाली.दादा कमी पैशात विजयी झाले.कृष्णराव मातब्बर पैसेवाले आसूनही पडले.दादांनी देहूच्या महाराष्ट्र बँकेतून दहा लाख कर्ज काढून ते विजयी झाले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले , दिगंबरदादा यांना आजातशञू हा शब्द योग्य ठरेल. कृषिभूषण पुरस्कार देताना सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे , आरूण नरके यांनी मला मोठेपणा दिला तो दिगंबरदादा मुळे ! !

यावेळी बाळासाहेब यांची शिवसेना तालुकाध्यक्ष राजूभाऊ खांडभोर , मनसे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर , उध्दव ठाकरे शिवसेना तालुकाध्यक्ष आशिश ठोंबरे , भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सायलीताई बोञे , राष्ट्रवादी महिला आध्यक्षा रुपालीताई दाभाडे , भंडारा डोंगर दशमी समिती अध्यक्ष. बाळासाहेब काशीद यांनी शोकसभेत भाषणे केली..श्री पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष, सोपानराव म्हाळसकर , भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर , लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव आदींनी भाषणे केली.सूञसंचालन माजी पंचायत समिती उपसभापती शांताराम कदम , व सहकारी यांनी केले. ह.भ.प.बाबाजी काटकर यांनी पसायदानाने सांगता झाली..

यावेळी भेगडे परिवारातील दिगंबरशेठ यांचे बंधू प्रसिध्द गाडामालक आण्णासाहेब भेगडे , भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे , माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचे सुपुञ मनोहर व प्रशांत आणि तीन मुली व परिवार उपस्थित हजारो लोक यावेळी उपस्थित होते..

संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष बाप्पूआण्णा भेगडे यांनी भेगडे परिवारातर्फे सर्व आजीमाजी आमदार , खासदार,लोकप्रतिनिधी , वारकरी , विविध क्षेत्रातील मान्यवर यांचेकडून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!