आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

धर्मवीर छञपती शंभूराजे जयंती व शिवराज्यभिषेकदिन औंढोली गावात साजरा .

धर्मवीर छञपती शंभूराजे जयंती व शिवराज्यभिषेकदिन औंढोली गावात भजन , हरिपाठ आणि प्रतिमा पूजनाने साजरा

Spread the love

धर्मवीर छञपती शंभूराजे जयंती व शिवराज्यभिषेकदिन औंढोली गावात साजरा …
आवाज न्यूज:लोणावळा ता.(प्रतिनिधी ) धर्मवीर छञपती शंभूराजे जयंती व शिवराज्यभिषेकदिन औंढोली गावात भजन , हरिपाठ आणि प्रतिमा पूजनाने साजरा करण्यात आला.
यावेळी मावळभूषण भजनसम्राट नंदकुमार शेटे यांचे हस्ते दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना.शेटे महाराज म्हणाले ,
धर्मरक्षणासाठी प्राणांची तमा न बाळगता व औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणारे ,मोगल, आदिलशहा,निजामशहा आदी चारही पातशहांशी यशस्वीपणे लढाई करून तब्बला नऊ वर्षापासून स्वराज्य रक्षणासाठी लढणारे , मुघल,डच,पोर्तुगीज ,इंग्रज यांना यशस्वी परतवून लावणारे , समुद्रात जंजिरा पर्यत पाण्यात सेतू बांधणारे छञपतींचे सह आग्र्याहून यशस्वीपणे निसटून येण्यासाठी व्ह्युव्हरचना आखणारे , चार संस्कृत ग्रंथ रचणारे आणि चाळीस दिवस औरंगजेबाचा छळ सहन करत मृत्यूला हसत हसत सामोरे जात धर्मासाठी बलीदान देणारे छञपती धर्मवीर संभाजीराजे यांचे जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे.
तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेला सुखी करणारे , देव , देवी यांची विटंबना करणारे , मंदिरे फोडणा-या अफजलखान राक्षसी ताकद असलेल्या शञूला गनिमी काव्याने वाघनखे व कट्यार वापरून कोथळा बाहेर काढून त्याचा वध करणारे , शाहिस्तेखानाचा पराभव करून बोटे तोडणारे , पन्हाळ्यावरून सुखरूपपणे विशाळगड गाठणारे , व सव्वा लाखाच्या सैन्यदलांतून निसटणारे आणि छञपतींचे ३२ मण सुवर्णा सिंहासनावर आरूढ होत शिवराज्यभिषेक करून घेणारे छञपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेकदिन असा दुग्धशर्करायोग असून संगीत भजनाने साजरा करण्यात आला. या छोट्याशा गावात हा कार्यक्रम चौदा वर्षे होत आहे , हे अभिमानास्पद आहे,असेही भजनसम्राट व मावळभूषण झीटाॕकीज , शेमारू मराटी येथे कीर्तनसाथ करणारे गायक नंदकुमार .शेटे म्हणाले.
यावेळी शंभूराजे व शिवछञपती यांचे पुर्णाकृती पुतळा व प्रतिमेचे पूजन राजे शिवछञपती कृषि व क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक शिवराम मांडेकर , संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र मांडेकर , आणि मावळभूषण भजनसम्राट नंदकुमार शेटे , तसेच वराळेचे माजी सरपंच राजूशेठ धुमाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळाचे भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंडळाचे सदस्य माणिक शिंदे , तबलावादक समीर मोरमारे , भाऊ शिंदे , जयेश मराठे , हिरामण मांडेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भजनी मंडळाचा ज्ञानेश्वरी , स्मृतिचिन्ह , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री हनुमान भजनी मंडळाचे भजनी मंडळाचे सदस्य यांनी भजन केले. जेष्ट वारकरी सूर्यकांत केदारी , अशोक मांडेकर , विश्वनाथ मांडेकर , युवराज मांडेकर , भरत मांडेकर , मृदूंगमणी अमोल घनवट , ज्ञानेश्वर शिर्के , विशाल मांडेकर , शंकर शिर्के , माजी पोलिसपाटील तुकाराम मांडेकर , आनंदा मांडेकर आदी उपस्थित होते.ता.११ तिथीनुसार धर्मवीर शंभूराजे जयंतीनिमित्त व
ता.१२ शिवराज्यभिषेकदिन निमित्त शिवछञपतींचे पुर्णाकृती पुतळा परिसरात व श्री हनुमान मंदिरात चैतन्य आले होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!