ताज्या घडामोडी

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य समतावादी साहित्य शिक्षक मंडळातर्फे जळगावात भव्य कवी संमेलन

Spread the love

निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे होणार बक्षीस वितरण

पहूर , ता .जामनेर दि . १३ ( शंकर भामेरे ) 

समतावादी साहित्य शिक्षक मंडळ जळगाव तर्फे प्रथमच भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे . तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेसह निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे .
जळगांव येथील खोटे नगरात असलेल्या सीताबाई गणपत भंगाळे विद्यालयात उद्या १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११. ३० वाजता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष तथा साहित्यिक प्राध्यापक भरत शिरसाठ हे भूषविणार असून मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर अतुल सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे . सहभागी कवींना सन्मानपत्र ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे . कवी संमेलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिव सुरेश पाटील उपाध्यक्ष डॉ . अशोक सैंदाणे यांच्या सह निबंध लेखन स्पर्धेचे प्रमुख रणजित सोनवणे , वक्तृत्व स्पर्धा प्रमुख श्रीमती वर्षा अहिरराव यांच्यासह संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!