ताज्या घडामोडी

निराधार रुग्णांना ब्लँकेटचे वाटप

Spread the love

रतन टाटांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण मुंबई कॅटरिंग आणि इव्हेंट असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आधुनिक भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक जडणघडणीत विविध घटकातील क्षेत्रातील दिग्गजांचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये सर्वाधिक योगदान कुणाचे असे विचारले तर या देशात जन्मलो, या देशासाठी काहीतरी करून जाईल अशी इच्छाशक्ती बाळगणारे उद्योगपती रतन टाटा यांचे नाव उच्चारले, तर वावगं ठरणार नाही. देशाचे आर्थिक चाक मजबूत करणारे उद्योगपती रतन टाटा यांचा बुधवारी ८५ वाढदिवस. रतन टाटा यांनी आपल्या कारकीर्दीत टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतल भारत सरकारने २००० साली पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

महान उदयोगपती जमशेदजी टाटा हे नाव भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील विशाल नाव. जमशेदजींचे कार्य त्यांचे देशाप्रती असलेले प्रेम, आदर आणि देशाला शक्तिशाली देश बनवण्याचा दूरदृष्टीकोन त्यांच्या पुढच्या पिढीला, जमशेदजींचे दत्तक नातू नवल टाटा यांचा मुलगा उद्योगपती रतन टाटा यांचे नाव यामध्ये अग्रक्रमाने येते. रतन टाटा बुधवारी ८६ व्या वषात पदार्पण करत आहेत.

२८ डिसेंबर, १९३७ रोजी रतन टाटा यांचा मुंबईत जन्म झाला. विविध धोरणं अवलंबून वाढवलेला व्यवसाय आणि त्यांची परोपकारी वृत्ती यासाठी ते भारतातील सर्वांना परिचित आहेत. त्यांचे समाजकार्य देशातील नागरिकांना नेहमीच प्रोत्साहन देत असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि कर्तृत्वाने दक्षिण मुंबई कॅटरिंग आणि इव्हेंट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन सत्यवान कोलगे आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी संतोष शेट्ये, फतेहसिंग गुजर, सागर सोहनी, नवनाथ परब नेहमीच प्रभावित असतात. विविध समाजकार्यांत अग्रेसर असणारे नितीन कोलगे आणि त्यांचे सर्व सहकारी प्रत्येकवेळी एक नवा वस्तूपाठ समाजापुढे ठेवतात. कोरोना काळापासून सातत्याने ते परळ येथील टाटा रूग्णालयाच्या गरजू रुग्णांना विविध प्रकारे मदतीचा हात देत असतात.

आज रतन टाटा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी परळ येथे मध्यरात्री ब्लँकेट वाटपाचे आयोजन भारतातील सुप्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या शुभहस्ते केले. याप्रसंगी मुंबईतील सुप्रसिद्ध डॉ. प्रागजी वाझा, युवा उद्योजक उदय पवार, समाजसेवक महेंद्र सातपुते, भरत शिंदे, शेखर छत्रे, राघू शेठ, सुप्रसिद्ध गायक, छायाचित्रकार अशोक पवार आणि साईनाथ रामपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वच मान्यवरांनी तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी याप्रसंगी रतन टाटा यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!