ताज्या घडामोडी

नेर्ले जिल्हा परिषद गट डि.पी.आय.पक्ष सर करणार -प्राः सुकुमार कांबळे

Spread the love

इस्लामपूर येथे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नेर्ले गावचे सुपुत्र शंभू बल्लाळ यांनी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला. त्यावेळी त्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष प्राः सुकुमार कांबळे सर, यांनी केला. त्यांच्या प्रवेशावेळी बोलताना प्राः सुकुमार कांबळे सर म्हणाले की नेर्ले जिल्हा परिषद गट डि पी आय पक्ष सर करणार असून. नेर्ले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार म्हणून मी आजच शंभू बल्लाळ यांची घोषणा करतोय. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून इस्लामपूर मतदार संघामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागेवर उमेदवार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे करुन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षाची ताकद दाखवून देणार असल्याचे मत प्राः सुकुमार कांबळे सर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना सर, म्हणाले की इस्लामपूर मतदार संघातील लोकप्रतिनिधी हे गोरगरीब लोकांचे कल्याण करतील पण खरेतर हे लोकप्रतिनिधी गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी ते भांडवलदार, व मातबर लोकांचेच हित पहाण्यात दंग आहेत. आज सर्वसामान्य लोकांचे छोटे छोटे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत. अशा जातीयवादी, धर्मांध शक्तीच्या लोकप्रतिनिधीना निवडून देण्यापेक्षा सर्वसामान्याचे हित पाहणारा पक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्ष असून या पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून गेले पाहिजेत यासाठी सर्वानी तयारीला लागावे. व पक्षाची ताकद संपूर्ण जिल्हयामध्ये वाढवावी असेही प्राः सुकुमार कांबळे सर यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदिप तात्या ठोंबरे, दयानंद चव्हाण आबा, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे, सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कबीर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष विरु फाळके, वाळवा तालुका अध्यक्ष सुरज वाघमारे, वाळवा तालुका युवक अध्यक्ष प्रविण वारे, उपाध्यक्ष रामभाऊ देवकुळे, सागर चव्हाण बुवा, तुषार चव्हाण, यानीही आपले मनोगत केली.
यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPI पक्षामध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी शंभू बल्लाळ यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मानसिंग बल्लाळ (भाटवडे) यांची वाळवा तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. सौः विद्या मोरे (रेठरेहरणाक्ष) यांची महिला आघाडी वाळवा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनिल घेवदे (रेठरेहरणाक्ष) यांची वाळवा तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
शेवटी आभार वाळवा तालुका अध्यक्ष सुरज वाघमारे यांनी मांडले.या प्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!