ताज्या घडामोडी

स्पर्धा परीक्षा आणि दबावाचे नियोजन

Spread the love

स्पर्धा परीक्षा म्हणजे “सर्वायवल ऑफ फिटेस्ट ” . डार्विनचा सिद्धांत सांगतो, की जे जगण्या लायक असतात ते आपला स्वतचा विकास करून घेतात व पुढे जातात आणि जे स्वत:चा विकास व बदल घडवून आणत नाहीत ते मागे पडतात. सबब आपण डार्विन च्या सिद्धांत प्रमाणे यशस्वी होण्याकरिता लायक बनले पाहिजे व आपला विकास करून घेतला पाहिजे .

अधिकाधिक कौशल्य प्राप्त करताना, अनेक अडचणी, समस्या सातत्याने जाणवत असतात . अनेक वेळा स्वतःच्या क्षमतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होते . आजूबाजूचे लोक, मित्रमंडळी, नातेवाईक, पालक या सर्वांचेच एक अनामिक दडपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सारखेच जाणवत राहते .
आणि याचाच परिणाम म्हणजे प्रचंड दबाव . बऱ्याच वेळा या दबावाखाली अभ्यास केल्यामुळेच योग्य पद्धतीने अभ्यास होत नाही आणि म्हणावे तसे यशही मिळत नाही .

त्यासाठीच स्पर्धा परीक्षांच्या या प्रचंड दबावाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक असते .
आणि त्याकरिता तज्ञ व्यक्तीचेच मार्गदर्शन घ्यावे .

*डॉक्टर अमित कुमार गोइलकर* , हे सामाजिक क्षेत्रात विशेषतः विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्ष मार्गदर्शन करत आहेत .

आणि आता स्पर्धा परीक्षेतील स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. गोविलकर आपल्या अकॅडमीत येत आहेत .

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय उत्तम संधी आहे. तुमच्या यशाचा मार्ग सुकर बनवण्यासाठी या विशेष सत्रासाठी आवश्य उपस्थित रहा .

हे विनामूल्य सत्र सर्वांसाठी खुले आहे .

*शनिवार दिनांक 17 डिसेंबर* 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता *ध्रुव अकॅडमी – बदलापूर* या ठिकाणी सदर मार्गदर्शन वर्ग संपन्न होईल .

महेश सावंत .
ध्रुव अकॅडमी .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!