आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ तळेगावचा स्तुत्य उपक्रम.

तहान भागवणारे हे तळे काही दिवसानंतर सांडपाणी साचून डबके झाले होते, या तळ्याचं उद्धाराच काम "देवराई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

Spread the love

लायन्स क्लब ऑफ तळेगावचा स्तुत्य उपक्रम.
आवाज न्यूज:तळेगाव दाभाडेला तळेगाव हे विशिष्ट नाव पडण्याच कारण येथे दोन तळी आहेत! त्यापैकी एक गावात आणि दुसरे स्टेशनभागात! एकेकाळी गावाची तहान भागवणारे हे तळे काही दिवसानंतर सांडपाणी साचून मरणासन्न झाले होते, या तळ्याचं उद्धाराच काम *देवराई संस्थेचे संस्थापक  गिरीश खेर, नवीनचंद्र म्हाळसकर, रवींद्र महाडिक, अध्यक्ष सुकंचंद्जी बाफना, खजिनदार डॉक्टर एस आर रावत” यांनी जवळजवळ चार वर्षे नेटाने हे काम केलं. यामुळेच तळ्याचं वेगळ दर्शन आम्हा लायन्स क्लबच्या सभासदांना झालं!
रोज सकाळ संध्याकाळ जवळ जवळ तळेगावचे 800 ते 900 नागरिक या शुद्ध आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत असताना , आमच्या बरोबरच ,आमचे अभ्यासू आणि सक्षम लायन अध्यक्ष ला दिपक बाळसराफ, पहात होतो की– जवळजवळ 4 – 5 किलोमीटर फिरून आल्यानंतर , नागरिकांसाठी निवांत बसण्याची कुठेही व्यवस्था नव्हती! ही त्या भागाची गरज पाहून- एका दिवसात अत्यंत संवेदनशील असलेले लायन अध्यक्ष लायन दीपक बाळसराफ यांनी– ला डॉक्टर स्वाधिन ढाकणे, ला डॉक्टर दत्तात्रय गोपाळघरे ,ला संजय साने आणि लायन राजेश म्हस्के, यांच्या अर्थसहाय्यातून जवळजवळ वीस गार्डन बेंचेसची व्यवस्था केली! लवकरच विविध दात्यांच्या माध्यमातून पन्नास पर्यंत बेंचेसची संख्या वाढणार आहे ! या उत्तम अशा उपक्रमाच उचित उद्घघाटन नजीकच्या काळात होणार आहे! पण त्या अगोदर ही काही क्षणचित्रे आपण बघत आहोत! आज उपस्थितांमध्ये “ज्येष्ठ लायन महेशभाई शाह – ला डॉक्टर शाळीग्राम भंडारी- लायन भरत पोद्दार,ला नंदकुमार काळोखे! विद्यमान अध्यक्ष लायन दीपक बाळसराफ त्यांच्या सुविद्य पत्नी लायन अनिता बाळसराफ! सेक्रेटरी लायन गौरव शहा त्यांच्या पत्नी लायन पायल शहा ,खजिनदार राजेंद्र झोरे! नवनिर्वाचित खजिनदार लायन सचिन शहा त्यांच्या पत्नी आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी असणारे ,नवनिर्वाचित अध्यक्ष- लायन अध्यक्ष लायन मयूर राजगुरव,चला तर मग आनंदाचे डोही आनंद अनुभव अनुभवूया!
समन्वय अधिकारी लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!