कामेरी, इटकरे व मसूचीवाडी येथे डॉ.बापूजी साळुंखे यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा
इस्लामपूर दि 8 (वार्ताहर )श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक ,संस्थापक डॉ.बापूजी साळुंखे यांचा 35 वा स्मृतिदिन
कामेरी, इटकरे व मसूचीवाडी येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
तुकाराम सावळा कदम विद्यामंदिर मसूचीवाडी ता. वाळवा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी सरपंच सौ.राधिका पाटोळे यांचे हस्ते डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करण्यात आला तर संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निवास देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी शाळा समिती उपाध्यक्ष मोहन कदम ,सदस्य शंकर कदम, विकास डुके, मुख्याध्यापिका सौ. एस. ए .पाटील उपस्थित होते.
त्यानंतर डॉ.बापूजी साळुंखे यांचे बालपण, त्यांचे शैक्षणिक ,सामाजिक,स्वातंत्र्य चळवळी
तील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा घेण्यात आल्या.मुख्याध्यापिका सौ. एस. ए पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.बी.आर.संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.सौ. एस.आर.कदम यांनी आभार मानले., यावेळी जेष्ठ शिक्षक यु .बी जाधव,सौ.एम.बी फाटक,सौ.एस.व्ही. रोकडे,मनोज कदम, रमेश पाटोळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कामेरी येथील डॉ.बापूजी साळुंखे विद्यालय व मा. छगन बापू पाटील गर्ल्स हायस्कूल येथे शाळा सल्लागार समिती अध्यक्ष अशोक जाधव व उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी डॉ.बापूजी व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली .यावेळी डाळे ,गंगाधर स्वामी,सुहास पवार,, पी.पी,सौ. ए.डी. पेडणेकर,सौ समीक्षा पाटील, वैशाली बारटक्के , एच.एम.साळुंखे,माणिक माने,राजू जेडगे उपस्थित होते.
भागशाला इटकरे येथे माजी उपसरपंच रामचंद्र पवार यांनी प्रतिमा पूजन केले.यावेळी ए. बी.पाटील,ए. डी. दुधारे,एस.व्ही.सदलगे उपस्थित होते.प्रतिमा पूजना नंतर डॉ.बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली