आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिष्यवृत्ती परीक्षेत जैन इंग्लिश स्कूलचे सलग चौथ्या वर्षी नेत्रदीपक यश 

Spread the love

तळेगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात आल्या. यामध्ये तळेगाव दाभाडे येथील जैन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर विशेष प्राविण्य मिळवून गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम ठेवून अद्वितीय यश प्राप्त केले .

यावर्षी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वज्ञ गणेश अनाप मावळ तालुका शहरी विभागातून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जिल्हास्तरीय त्याने 55 वा क्रमांक संपादित केला. तर फलक प्रवीण पाटील हिने तालुका स्तरावर द्वितीय तसेच जिल्हास्तरावर 234 व्या क्रमांकाने यशस्वी होण्याचा सन्मान मिळवला.

तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हर्षवर्धन मुकुंद पवार तालुकास्तरावर प्रथम क्रमांक जिल्हा स्तरावर विसावा क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाला. हर्षवर्धन हरिभाऊ कुलकर्णी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक जिल्हास्तरावर 124 वा क्रमांक मिळवून यशाचा मानकरी ठरला. तर गायत्री सुशील भेगडे ही तालुक्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाने व जिल्हा स्तरावर 253 वा क्रमांक मिळवून यशस्वी ठरली. तसेच गार्गी संदीप लिंगायत तालुकास्तरावर चौथ्या क्रमांकाचे  तसेच जिल्हास्तरावर 296 क्रमांक संपादन करून यशस्वी झाली .

सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून प्राविण्य मिळवून तळेगाव तसेच मावळ तालुक्यात सर्व स्तरावर मानाचा तुरा रोवून जैन इंग्लिश स्कूलला नेत्रदीपक यश मिळवून दिले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका विजया शिंदे तसेच विपुल भुसारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

गरुड झेप घेऊन यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन शाळेच्या तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, संचालक मंडळ व शिक्षकांनी केले. संचालक मंडळाने जैन इंग्लिश स्कूल सदैव अशीच यशस्वी वाटचाल करत राहील अशा शुभेच्छा दिल्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!