ताज्या घडामोडी

मांगरूळ येथील नम्रता मस्के यांचा सत्कार

Spread the love

प्रतिनिधी / (ता. शिराळा) येथील कु. नम्रता ज्ञानदेव मस्के हीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (MPSC) च्या विक्रीकर निरीक्षक (एस.टी.आय.) परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज नाईक उपस्थित होते. त्यांनी कु. नम्रताचे अभिनंदन केले. नम्रताने मंत्रालय सहाय्यक म्हणून राज्यात आठवा क्रमांक मिळाला आहे. एकाच वेळी दोन्ही परीक्षेमध्ये राज्यात येणारी मांगरूळ मधील शेतकरी कुटुंबातील पहिलीच मुलगी आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी माजी सरपंच संग्राम पाटील, निलेश पाटील, ज्ञानदेव मस्के, नालंदा अभ्यास केंद्राचे स्वप्नील मस्के आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!