आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

आकुर्डीच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा..

महाराष्ट्र वारकरी महामंडाळच्या माध्यमातून चंपाषटी निमित्त १००८ श्री एकनाथी भागवत लिखाण पारायण करण्यासाठी १००८श्रीएकनाथी भागवत व वही मोफत वाटप करण्यात आली..

Spread the love

आकुर्डी येथील श्री खंडोबा मंदिरामध्ये चंपाषठी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी ३० नोव्हेंबर.

या दिवशी मंदिरास फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या दिवशी पहाटे ५ वाजता मंदिरातील शंकराच्या पिंडीला व खंडोबाच्या मुर्तीस योगेश शिवाजी काळभोर व काजल योगेश काळभोर आणि अमोल अनंत काळभोर व स्नेहल अमोल काळभोर यांच्या हस्ते अभिषेक करून आरती करण्यात आली.

तसेच संध्याकाळी ४ ते ७ वाजे पर्यंत थेरगाव येथील ओम श्री नाथ मल्हार यांनी मंदिराच्या सभा मंडपात जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. ७ वा. महाआरती करण्यात आली या नंतर आलेल्या ५ ते ६ हजार भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी तानाजी काळभोर,शामराव काळभोर,शंकर आप्पा काळभोर,सोमनाथ काळभोर,जंगलीमहाराज काळभोर ,दिपक काळभोर,भाऊसाहेब काळभोर,अॅड राजेंद्र काळभोर, दत्तात्रय काळभोर,राजेंद्र ल.काळभोर,मार्तंड रेवी, संदीप केंदळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे,तानाजी खाडे, सचिन चिखले,अमित गावडे,माजी नगरसेविका शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर,लिलावती काळभोर,वडगाव चे नगरसेवक श्रीधर चव्हाण,ॲड जिजाबा काळभोर,ॲड प्रविणभाऊ झेंडे ,ॲड कृष्णाभाऊ दाभोळे, ॲड जालिंदर राऊत,ॲड दिपक चव्हाण,मारूती आप्पा काळभोर, शिवाजी काळभोर, तुकाराम काळभोर, सचिन काळभोर,बंडू काळभोर,दिलीप काळभोर,संभाजी काळभोर इ.उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र वारकरी महामंडाळच्या माध्यमातून चंपाषटी निमित्त १००८ श्री एकनाथी भागवत लिखाण पारायण करण्यासाठी १००८श्रीएकनाथी भागवत व वही मोफत वाटप करण्यात येणार ,यावेळी श्रीएकनाथी भागवत व वही चे प्रकाशन सोहळा देहु देवस्थान संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे,विश्वस्त ह.भ.प. सुनिल महाराज मोरे, युवा किर्तनकार शेखर महाराज जांभूळकर, महाराष्ट्र वा.म.पिंपरी- चिंचवड चे अध्यक्ष विजय (आण्णा) जगताप, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, सदस्य कैलास कातळे, इंद्रसिंग राजपूत, सुधीर ढगे,किशोर पाटील, किसन नेटके,चनाप्पा हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक स्वरूपात ६ भाविकांना श्रीएकनाथी भागवत व वही मोफत देण्यात आली यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान पठारे व विश्वास थोरात यांनी केले व आभार तानाजी काळभोर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!