ताज्या घडामोडी

पंढरपूर येथे बुधवारी रासपचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा – गोरख वाकडे.

Spread the love

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख व महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक

पंढरपूर येथे दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी आयोजित पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळाव्यास माढा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख गोरख वाकडे यांनी सांगितले. बुधवारी दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी १.०० वा श्री संत तनपुरे महाराज चारोधाम ट्रस्ट स्टेशन रोड, पंढरपूर येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री आ.महादेवरावजी जानकर साहेब उपस्थित मार्गदर्शन करणार आहेत तरी माढा तालुक्यातुन जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर जानकर आपल्या पक्षाची भुमिका स्पष्ट करणार आहेत त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख गोरख वाकडे यांनी माढा तालुक्यातुन पंढरपूर येथील मेळाव्यास जास्तीत जास्त कार्यकर्ते घेऊन जाणार असल्याचे सांगीतले. तसेच तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी यांनी स्वताच्या गावातून किमान एक तरी वाहन करुन आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन गोरख वाकडे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!