आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम..

Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम..All IndiaVarious programs on Wednesday on the occasion of Marathi Natya Parishad’s anniversary..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ मे.

तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी ३१मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कलाक्षेत्रातील कलाकारांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.

वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सायंकाळी सहा वाजता कै. गोळवलकर गुरुजी क्रीडांगण येथे अभिनेते मिलिंद गवळी व अभिनेत्री रुपाली भोसले यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, लेखक प्रभाकर ओव्हाळ, मधमाशीपालन क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवणारे विजय महाजन, कलाकार सायली रौंधळ, अविनाश नांगरे, नयना डोळस यांचा विशेष गौरव अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचे हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नियामक मंडळ सदस्य विजय चौगुले, अभिनेते राजन भिसे, विजय गोखले, सविता मालपेकर, गार्गी फुले आदी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!