आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेत ओणम व गणेश चतुर्थी सण एकत्रित साजरा ।।

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेतील एम.बी.ए. व एम.सी.ए. च्या 70 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग ।।

Spread the love

प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेत ओणम व गणेश चतुर्थी सण एकत्रित साजरा

आवाज न्यूज:  गुलामअली भालदार, चिंचवड 13

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेतील एम.बी.ए. व एम.सी.ए. च्या 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित शाडू मातीने बनविलेली मूर्ती, फुलांची आकर्षक रांगोळी, ढोल-ताशा बरोबरच केरळचे पारंपारिक वाद्य भिरूवादीरा, चेंदामेलम (केरळ ड्रम बीट्स) पारंपारिक नृत्य आदी उपक्रमे स्पर्धा स्वरूपात राबवित ओणम व गणेश चतुर्थी सण एकत्रित साजरा करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश शहरवासियांना देण्यात आला. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी पारंपारिक केरळची वेशभूषा परिधान करून वैशिष्ट्यपूर्ण नृत्याचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कमला एज्युकेशन सोसायटीच्या खजिनदार डॉ.भूपाली शहा यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आय.आय.एम.ए. संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, डी.वाय.पाटील सेंटर ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च विभागाचे संचालक डॉ. सुनिल धनवडे उपस्थित होते. यावेळी एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, शाखेचे विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर समवेत प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन प्रा. नीजी साजन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!