ताज्या घडामोडी

हर घर तिरंगा,अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे- आ. सचिन कल्यांणशेट्टी

Spread the love

गावातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनी नागरिकांना संबोधित करावे.- तहसीलदार, बाळासाहेब सिरसट

वागदरी मध्ये हर घर तिरंगा रॅली च्या माध्यमातून जनजागृती

अक्कलकोट दि ०८
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे आज प्रबोधन पर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती व गावात वृक्षारोपण करण्यात आले असून, येत्या १३,१४व १५ ऑगस्ट ला राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. विशेष करून ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच,सदस्य, सर्व खात्यातील सरकारी ,निमसरकारी कर्मचारी, यांनी स्वतःसह नागरिकांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रबोधन करायचं असून, वागदरी ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, पंचायत समिती व टाटा पावर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ सचिन कल्यांणशेट्टी, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, बीडीओ सचिन खुडे, महावितरण उपअभियंता संजीवकुमार म्हैत्रे, कृषी अधिकारी माळी, टाटा पावर जीएम राजीव सामंत, विजय पिसे, पोलीस अधिकारी एपीआय महेश भावीकट्टी, सर्कल संतोष कांबळे, तलाठी एम जगताप, ग्रामसेवक राजेंद्र कणमुसे, वैद्यकीय अधिकारी शुभांगी बेबडे, सरपंच श्रीकांत भैरामडगी उपसरपंच श्रीमती लक्ष्मीबाई पोमाजी, हे उपस्थित होते.
`हर घर तिरंगा’ अभियान हा कुठल्याही राजकीय पक्षांचा विषय नाही तर आपल्या अस्मितेचा, राष्ट्रप्रेमाचा आणि देश भक्तीचा प्रेमाचे प्रतीक असून, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले असून, आज आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. येत्या १३, १४, व १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरावर आपल्या अस्मितेच प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वज फडकावून राष्ट्रभिमान बाळगावा. आणि प्रत्येक नागरिकाला यात सहभाग घ्यायला सांगून अभियान यशस्वी करावं असे आवाहन तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी यावेळी केले.
या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गावातील तंटामुक्त अध्यक्ष शांतू , शिरवळचे अप्पू बिराजदार, सांगवीचे माजी सरपंच अबूबकर शेख, एक्सईड बॅटरी चेकिंग इन्सपेक्टर संजयकुमार भोसले , वागदरी ग्रा प सदस्य श्रीकांत इंडे , रेखा कुंबळे, सिंधुताई सोनकवडे, राजकुमार हुग्गे, शरदाबाई रोट्टे, महानंदा सावंत, हनिफ मुल्ला, श्रीशैल ठोंबरे, अबूबाई मगाने, पंकज सुतार, सुजाता घुले, शिवानंद घोळसगाव, कावेरी नंजूंडे, शिवराज पोमाजी, संतोष पोमाजी, लक्ष्मण मंगणे, सुनील सावंत, लक्ष्मण पवार, बसवराज शेळके, पंकज सुतार, कोतवाल फिरोज तांबोळी, क्लार्क रमेश सावंत, पोलीस कर्मचारी धनराज शिंदे, विपीन सुरवसे, अंकुश राठोड, राम चौधरी, घालय्या मठपती, जिल्हा परिषदेचे कन्नड व मराठी मुलांचे व मुलींचे व तसेच शेळके प्रशालेचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग व विध्यार्थी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!