ताज्या घडामोडी

केळवेत शिक्षिकेचा सन्मान, विद्यार्थी आणि शिक्षक झाले भावुक

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
नुतन विद्या विकास मंडळाच्या आदर्श विद्यामंदिर केळवे येथील सहशिक्षिका शिवानी गवाणकर यांचा निरोप व सत्कार समारंभ मंगळवारी (ता. २९) केळवे येथील श्री शितलाई मंगलधाम सभागृहामध्ये पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विविध पाटील होते. विविध पाटील यांनी केळवे हे एक संवेदनशील गाव असून येथील प्रत्येक गोष्टीकडे ग्रामस्थांचे बारकाईने लक्ष असते. म्हणूनच येथे काम करतांना सर्वसमावेशक असे काम करावे लागते असे उत्कृष्ट काम सेवानिवृत्त शिक्षिका शिवानी गवाणकर यांनी केले असून त्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पालघर जिल्हा संस्थाचालक संघटनेचे कार्यवाह प्रकाश पाटील होते. पाटील यांनी सांगितले की, एखादा उपक्रमशील शिक्षक हा त्या शाळा किंवा संस्थेचाच शिक्षक नसतो तर तो संपूर्ण समाजाचा किंबहुना देशाचा एक आदर्शवत शिक्षक असतो. त्या शिक्षकाकडे असंख्य लोक आशेने आणि आदराने पाहतात. म्हणूनच शिक्षकांचं समाजातील वागणं हे अत्यंत जबाबदारीचे असणे आवश्यक आहे. गवाणकर यांनी विद्यार्थ्यांना लळा लावून शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्या एक संवेदनशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह अशोक राऊत यांनी केले.माजी मुख्याध्यापक तथा विश्वस्त हरिहर पाटील, विनोद पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन राऊत, शिक्षक प्रतिनिधींचे मनोगत मनीषा पाटील, गवाणकर यांच्या कुटुंबीयांतर्फे ऋतिका संखे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी केळवे शेतकी सोसायटीचे चेअरमन जयेश पाटील, पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, माध्यमिक पतपेढीचे माजी संचालक रवींद्र नाईक, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, विश्वस्त, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्था, शाळा तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था तर्फे शिवानी गवाणकर आणि त्यांचे पती राजेश गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्ती शिवानी गवाणकर यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, ज्ञानरूपी मंदिरातून बाहेर पडत असताना अंतकरण जड झाले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि संस्था तसेच कुटुंबीयांचे अनमोल सहकार्य लाभल्याने विद्याधानाचे पवित्र काम करता आले. त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक भावुक झाले होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रफुल्ल पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!