क्रीडा व मनोरंजन

१४वर्षांखालील मुलामुलींसाठी लवकर एका स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

मुंबई :- १४वर्षांखालील मुलामुलींसाठी संघटनेच्यावतीने स्पर्धा आयोजनाचा महत्वपुर्ण निर्णय मुंबई शहर कबड्डी असो.च्या वार्षिक सभेत घेण्यात आला. या खेळाडूंची नोंदणी देखील विनामूल्य करण्यात येईल. मुंबई शहर कबड्डी असो.ची “५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा” संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे संपन्न झाली. संघटनेने गतवर्षांपासून “ऑन-लाईन” खेळाडू नोंदणी सुरू केली असून सर्व संलग्न संस्थानी आपल्या खेळाडूंची ऑन-लाईन नोंदणी करून संघटनेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मुंबई शहरच्यावतीने सचिव विश्वास मोरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्यावतीने रवींद्र देसाई या सभेला निरीक्षक म्हणून उपस्थित होते. सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!