ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा हा सोहळा पार पडण्यासाठी अनेकजन सक्रिय

Spread the love

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा हा सोहळा पार पडण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात राहून भूमिका निभावली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या महापालिकेमध्ये होत असलेले स्मारक हे वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवकांच्या कुशल कार्यप्रणालीचा एक भाग आहे म्हणूनच दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी महापालिकेच्या वतीने हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. हा सोहळा पार पडण्यासाठी सर्वात पहिले योगदान जर कोणाचे असेल तर ही जागा उपलब्ध करून देणाऱ्या रघुवंशी सोसायटीच्या सर्व सभासद बांधवांचे त्यांच्यामुळेच हे स्मारक या सांगली सारख्या शहरांमध्ये उभे राहू शकले. एखादे स्मारक उभा राहत असताना 2008 पासून ते 2022 पर्यंतचा फार मोठा कार्यकाळ यामध्ये गेला 2008 साली असणारे महापौर नितीन सावगावे दूरदृष्टी व कुशल नेतृत्वामुळे या स्मारकाचे कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी नगरसेवक विष्णू माने , मणगु आबा सरगर, वंदना सायमोते, माजी महापौर संगिताताई खोत यांचेसह सात नगरसेवकांचा सहभाग होता यांच्या प्रयत्नामुळे सुरुवात होऊन आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर महापौर संगीता ताई खोत यांच्या काळामध्ये बराच निधी या स्मारकाला प्राप्त झाला त्यावेळी महापालिकेत असणाऱ्या सर्व नगरसेवकांचे योगदान लाभले त्यावेळीही उद्घाटन करण्याचा मानस सर्वानी बोलून दाखविला त्यावेळी भाजपची सत्ता असतानाही वरिष्ठ नेत्यांना आणून उद्घाटन करण्याचा प्रयत्न covid-19 सारख्या महामारीमुळे लांबला गेला. आज महापालिकेमध्ये सत्ता बदल झाला असून यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार महापालिकेवर आले महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व सर्व नगरसेवक यांच्या योगदानातून महापालिकेच्या योगदानातून हे स्मारक पूर्णत्वाकडे गेले बऱ्याच महिन्यापासून उद्घाटनाची तारीख फिक्स होत नव्हती ती एकदाची फिक्स झाली. फिक्स करत असताना सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील दहा ते पंधरा नगरसेवक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती समाजबांधव बहुजन बांधव यांची एक मोठी बैठक घेण्यात आली व त्यावेळी सर्वानुमते 2 एप्रिल च्या कार्यक्रमाला या असे सर्व नगरसेवक यांनी सोशल मीडियाच्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केले व थोड्याच म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये दोन कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रिक मीडियासमोर बोलत असताना जर लोकप्रतिनिधीने भान ठेवले नाही तर याचे परिणाम जनमानसात वाईट होतील जनमानसात आपली प्रतिमा वाईट होईल याचेही भान राहिले नाही विरोधच करायचा होता तर त्या बैठकीमध्ये पक्षांच्या वरिष्ठांना बोलून कळवितो असा मेसेज द्यायला हवा होता परंतु तसे झाले नाही तर या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त फूट कसे पडेल या दृष्टीने काम सुरू झाले अशी फूट जगावर राज्य करणाऱ्या रणरागिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाचा वारसा घेऊन जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना शोभेल का ….व जनता या लोकप्रतिनिधींना विचारल्याशिवाय राहिल का …हाच मोठा प्रश्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!