ताज्या घडामोडी

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे ठाण्यात स्वच्छता अभियान

Spread the love

डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यावतीने ठाणे शहरात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवार, दि ०४/१२/२०२२ रोजी करण्यात आले होते या वर्षी आपण ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्ष, स्वछता अभियान (ठाणे महानगर पालिका अंतर्गत) तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत याचेच औचित्य साधून सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आदरणीय तीर्थरूप डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच आदरणीय तीर्थरूप डॉ श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनातून
आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे त्याकरिता स्वच्छता मोहिमेत ठाणे व मुंबई परिसरातील श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन महत्वपूर्ण योगदान दिले सकाळी सात वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली
ठाणे विभागातील डोंगरीपाडा, वाघबिळ गाव, कासारवडवली गाव, बाळकुम पाडा न. १, २, ३ , कापुरबावडी, मानपाडा, मनोरमानगर,
मुंबई विभागातील मुलुंड आय टी आय (ईस्ट), आर आर टी रोड, मुलुंड (वेस्ट), भांडुप (पूर्व आणि पश्चिम), विक्रोळी (पूर्व आणि पश्चिम)
इत्यादींची स्वच्छता केली
या उपक्रमात सुमारे १८२७ स्वयंसेवकानी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आणि ११२ टन सुका कचरा गोळा केला. या प्रसंगी आमदार,नगरसेवक, शासकीय कार्यालयातील अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती होते. ठाणे विभागात आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!