ताज्या घडामोडी

विश्वास साखर प्रगती मध्ये अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा मोठा वाटा – आमदार मानसिंगराव नाईक

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
विश्वास साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा कारखान्याच्या प्रगती मध्ये मोठा वाटा आहे असे प्रतिपादन विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली ( ता.शिराळा ) येथे विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक , उपाध्यक्ष पदी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल विश्वास साखर कामगार संघटना ( इंटक) यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव साळुंखे , जिल्हा साखर कामगार समन्वय समिती सचिव विजयराव नलवडे , उपाध्यक्ष विजयराव पाटील , कामगार संचालक दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले की, कारखान्याची काटकसरीने सुरू असलेली वाटचाल , २५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता असताना ६००० मेट्रिक टन पर्यंत गाळप क्षमता , ऊस क्षेत्र वाढ आदी मुळे कारखाना प्रगतीपथावर आहे हे सर्व ऊस उत्पादक , सभासद , अधिकारी , कर्मचारी वर्ग यांच्यामुळे शक्य झाले आहे असे सांगितले.यावेळी माजी आमदार सत्यजीत पाटील , प्रचिती चे अध्यक्ष अमरसिंह नाईक ,सरपंच राजेंद्र नाईक , युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक , माजी सभापती सम्राटसिंह नाईक , कार्यकारी संचालक राम पाटील , सचिव सचिन पाटील , प्रमोद नाईक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!