ताज्या घडामोडी

डांगे आयुर्वेद महाविद्यालयात हृदयार्णव 2022 राष्ट्रीय वेबिनार उत्साहात

Spread the love

मा .श्री .अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, पदव्युत्तर संशोधन केंद्र, आष्टा येथे कायचिकित्सा विभागाच्या वतीने ‘हृदयार्णव 2022’ हा राष्ट्रीय वेबिनार उत्साहात संपन्न झाला .देशभरातून ८४९ तज्ञ, अध्यापक व विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. सांगली येथील प्रसिद्ध धन्वंतरी जनरल फिजिशियन डॉ.सतिश परांजपे व राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान, जयपूर येथील वैद्य हरीश भाकुनी यांचे प्रमुख वक्ते म्हणून बहुमोल मार्गदर्शन लाभले .तसेच डॉ. मिनल वैद्य यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परीक्षक म्हणून काम पाहिले.सदर वेबिनारची सुरुवात धन्वंतरी स्तवनाने झाली. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष मा. श्री. अण्णासाहेब डांगे (आप्पा), सचिव ॲड. राजेंद्र डांगे, कार्यकारी संचालक प्रा.आर.ए.कनाई यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली सदर राष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाली अध्यक्षस्थानी होते. कायचिकित्सा विभागप्रमुख व वेबिनारचे स्वागताध्यक्ष डॉ.पराग देशमुखे , डॉ.स्मिता लोखंडे, डॉ. दत्तात्रय निकम ,डॉ. वर्षा खोत, डॉ. रुपाली पाटील, डॉ.सुशांत कणसे यांनी वेबिनारचे उत्कृष्ट संयोजन केले.प्रथम वर्ष कायचिकित्सा पदव्युत्तर विद्यार्थिनी डॉ. स्नेहा टकले हिने सूत्रसंचालन केले व प्रथम वर्ष पदव्युत्तर विद्यार्थी डॉ.अथर्व खाडे याने सहाय्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!