ताज्या घडामोडी

शहरात घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २ (प्रतिनिधी)

शहरातील बहुतांश भागात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरून घाणपाणी साचून आहे. त्याला जाण्यासाठी मोकळ्या वाटा करून देण्यासोबतच गटारीतील घाण सातत्याने साफ करणे, नियमित औषध फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु नगर परिषद प्रशासन आणि स्वच्छता विभाग यावर मूग गिळून गप्प असून नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून नियमानुसार स्वच्छता होत नसल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका असून मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच शहरांतील नागरिकांचा जीव टांगणीला लावून नगर परिषद प्रशासन गप्प बसले आहे. वरील समस्यांवर तात्काळ उपाययोजना नाही केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात येईल. या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले जातील असे सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष मोहित शिंदे, युवक शहराध्यक्ष बाबा कुरेशी, सचिव सागर बिराजदार, कार्याध्यक्ष ज्योतिबा शिंदे, संघटक इम्रान सय्यद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!