ताज्या घडामोडी

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला पोलीस दलामधील उत्कृष्ट सेवेसाठी अमरसिंह भोसले यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Spread the love

अशा या आनंदाच्या प्रसंगी आपल्याशी संवाद साधताना आज माझ्या हृदयात कृतज्ञतेची भावना अन् कृतार्थतेचे समाधान दाटले आहे.पोलीस दला मधील सर्वोच्च अशा या पुरस्काराने जरी मला सन्मानित करण्यात येत असले तरी माझ्या आजवरच्या जिवन प्रवासात व ३३ वर्षाच्या सेवा कालावधी मध्ये आपण केलेले बहुमोल मार्गदर्शन व अमुल्य असे सहकार्य यामुळेच मला हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला असे मी मानतो. त्यामुळे खरं तर या पुरस्काराचे सारे श्रेय आपणा सर्वांनाच जाते.मला या सर्वोच्च पुरस्कारासाठी पात्र मानले, यासाठी प्रथम मी महामहिम राष्ट्रपतीजी, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पोलीस दल, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग व व्यक्तिशः आपले अत्यंत विनम्रपणे आभार मानतो.

तसेच कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू पश्चात चेहरा सुध्दा न दिसलेल्या माझ्या वडीलांच्या पवित्र स्मृतीस हा पुरस्कार समर्पित करतो शी भावना अमरसिंह भोसले,सहा.पोलीस उप निरीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो,कोल्हापूर यांनी व्यक्त केली. तसेच अमरजी आपल्या पोलीस सेवेतील उत्कृष्ट कार्यामुळे आपल्याला प्राप्त झालेल्या ” राष्ट्रपती पदक” हा बहुमान आम्हाला भूषणावह व गौरवास्पद आहे.तुमच्या या गरुड यशाबद्दल अध्यक्ष.श्री. हनुमान मंदिर जिर्णोद्धार कमिटीच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन व आपल्या भविष्यातील वाटचालीस शुभकामना श्री सुर्यकांत  तोडकर यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!